महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे 16 मे : काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे कोरोनाने निधन झाले आहे. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. मागील 21 दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. संसदरत्न खासदार राजीव सातव यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती.
राजीव सातव हे कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवीन व्हायरस आढळला होता. त्यांच्या शरीरात या विषाणूचा संसर्ग झाला झाल्यानं प्रकृती गंभीर झाली होती. खासदार राजीव सातव यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, नंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत होती, तसेच कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाल्याचे डॉक्टरांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं होते. त्यामुळे लवकरच राजीव सातव यांना रुग्ण्यालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती. पण, अचानक राजीव सातव यांची प्रकृती खालावली होती. सायटोमॅगीलोने ग्रासल्याने आज त्यांची प्राणज्योत मालवली.
19 एप्रिलपासून राजीव सातव यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत होती. 22 तारखेला त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. 23 एप्रिलपासून पुण्यात जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. 28 तारखेपासून ते व्हेंटिलेटरवर होते. राहुल गांधी यांचे ते अत्यंत निकटवर्तीय होते.
गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 दिवेआगर…
बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजगुरुनगरमध्ये…
सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अन्नपदार्थ…
रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेडमध्ये…
गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेड…
सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दिल्लीत…
This website uses cookies.