गुन्हेगारी

सिनेस्टाइल पाठलाग करून चाकण पोलिसांनी जप्त केला शस्त्रसाठा, विधीसंघर्शीत बालकासह एकास अटक

सिनेस्टाइल पाठलाग करून चाकण पोलिसांनी जप्त केला शस्त्रसाठा, विधीसंघर्शीत बालकासह एकास अटक

महाबुलेटीन न्यूज
चाकण : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असणाऱ्या चाकण शहरातील एका दुचाकीचा पाठलाग करुन त्यांच्याकडून घातक शस्त्रसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपींला ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे एक वाजण्याच्या सुमारास रात्री चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत नगरपरिषद चौक चाकण येथे गस्त घालत असताना चाकण शहर बिट मार्शलचे गस्तीवरील अंमलदार यांना एका दुचाकीवरून दोघेजण संशयास्पदरित्या फिरताना आढळले. पोलीसांनी दुचाकीला थांबण्याचा इशारा केला. पोलिसांनी थांबण्यास सांगूनही दुचाकीस्वार थांबला नाही. उलट पुन्हा वेगाने जाऊ लागला. त्यामुळे बिट मार्शलने दुचाकीचा चाकण शहराच्या गल्ली बोळातून सुमारे दोन ते तीन किलोमीटर पाठलाग केला. देशमुख आळी, चाकण येथे सदर दुचाकी गाठली आणि त्यावेळी योगेश भरत डोंगरे (वय 21, रा. शनिमंदिरा जवळ, चाकण) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

दुचाकीवरील दोघांची पोलिसांनी झडती घेतली. त्यावेळी एका गोणीमध्ये एक लोखंडी तलवार, एक लोखंडी गुप्ती, एक लोखंडी कोयता व एक लोखंडी सत्तुर अशी घातक हत्यारे मिळाली. हत्यारे, दुचाकी, मोबाईल फोन, असा एकूण 37 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ एक) मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे, महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियांका साळुंखे, पोलीस कर्मचारी बजरंग साबळे, हनुमंत कांबळे, संतोष पंदरकर, मंगेश फापाळे, प्रेमकुमार पावडे, होमगार्ड भोकसे, कलेवडे, ग्रामसुरक्षा दलाचा जवान दिनेश सांगडे यांनी ही कारवाई केली.
०००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 18 Apr 2026

शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

1 day ago

MahaBulletin — 18 Apr 2026

मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

1 day ago

MahaBulletin — 14 Apr 2026

मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 13 Apr 2026

रविवार, १२ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 भीमाशंकर…

6 days ago

MahaBulletin — 12 Apr 2026

शनिवार, ११ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 भेसळयुक्त…

1 week ago

MahaBulletin — 12 Apr 2026

शनिवार, ११ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 मँगो…

1 week ago

This website uses cookies.