महाबुलेटीन न्यूज । सतीश चांभारे
राजगुरूनगर : “कोरोना काळात आपल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करून कोरोना रुग्णांना प्रामाणिकपणे आरोग्य सेवा देणाऱ्या चांडोली ग्रामीण रुग्णालयातील सफाई कामगार, आशा वर्कर, ड्रायव्हर, नर्स, मेडिकल शिक्षण घेणारे विध्यार्थी, डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या कामाची जाणीव ठेवून या सर्व कोरोना योध्यांचा सन्मान करण्याचे सामाजिक बांधिलकी ठेवण्याच्या दृष्टीने राजगुरूनगर येथील जाणीव जागृती मंचाने राबविलेला हा उपक्रम फार मोठा मोलाचा आहे” असे गौरव उदगार पंचायत समिती खेड चे सभापती अरुण चौधरी यांनी काढले.
राजगुरूनगर येथील जाणीव जागृती मंचाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात चांडोली ग्रामीण रुग्णालयातील कोरोना योद्यांच्या आयोजित केलेल्या सन्मान कार्यक्रमात सभापती चौधरी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला पंचायत समितीचे उपसभापती अमर कांबळे, माजी सभापती अंकुश राक्षे, चांडोली ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. भगवानराव काकणे, डॉ. प्रमोद वाडेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव सतीश चांभारे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पी. टी. शिंदे, महाराष्ट्र राज्य मानव अधिकार महासंघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब ताये, मुंबई-कर्जत-भिमाशंकर रस्ता संघर्ष समितीचे अध्यक्ष किसनराव गोपाळे, मंचाचे अध्यक्ष विठ्ठलराव भोर , उपाध्यक्ष विठ्ठलराव मांजरे, सचिव बाळासाहेब गारगोटे, सर्व संचालक, सभासद आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी ८८ कोरोना योध्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, स्मूतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी उपसभापती अमर कांबळे, माजी सभापती अंकुश राक्षे, डॉ. भगवानराव काकणे आदिंनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंचाचे अध्यक्ष विठ्ठलराव भोर आणि सूत्रसंचालन सचिव बाळासाहेब गारगोटे, तर आभार पत्रकार सतीश चांभारे यांनी मानले.
००००
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.