महाबुलेटीन न्यूज
चाकण : कडाचीवाडी ( ता.खेड ) येथील पी के फाऊंडेशन या कॅम्पसमध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. प्रतापराव खांडेभराड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. अंकुशराव नाणेकर, संस्थेच्या सचिव सौ. नंदाताई खांडेभराड, कॅम्पसचे डायरेक्टर श्री. संजय सिंग, पी के ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री.रोहीदास भोर, पी के इंटरनॅशनल स्कुलच्या मुख्याध्यापिका सौ. सई तिकोणे व संपूर्ण शिक्षकवृंद उपस्थित होते. पी के फाउंडेशन हि चाकण परिसरामध्ये नावारूपास आलेली एक अग्रेसर शिक्षण संस्था असून, संस्थेने कोरोना महामारीच्या काळातही ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानदानाचे काम अविरत रित्या चालू ठेवले आहे. ऑनलाईन शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने मागील वर्षभर विविध उपक्रम संस्थेमार्फत ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आलेले आहेत व विद्यार्थ्यांच्या कला व कौशल्य विकसित होण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे. ते विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरलेले पाहायला मिळत आहेत.
००००
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…
This website uses cookies.