पुणे जिल्हा

चाकण विकास योजना सूचना व हरकती सुनावणी कोरोना कालावधीत घेण्यास शहर काँग्रेस व नागरीकांचा विरोध

 

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : शहर प्रारूप विकास आराखडा सूचना व हरकती नारीकांनी फेब्रुवारी – 2020 ते मार्च – 2020 दरम्यान नोंदविलेल्या आहेत, दरम्यान 23 मार्च 2020 नंतर टाळेबंदी व अनलॉक अशंतः जुन 2020 नंतर सुरू झाले. दरम्यान जुलै-2020 मध्ये कोरोना रूग्ण वाढलेवर टाळेबंदी 15 दिवस झाली आहे, आगस्ट व सप्टेंबर 2020 मध्ये कोरोना रूग्ण वाढीचा उच्चांक खेड तालुक्यात झाला असून चाकण शहर जिल्ह्यात सर्वात जास्त बाधित नगरपरिषद क्षेत्र घोषित झाले आहे. एकंदर राज्यातील परिस्थिती पाहता शासनाने विकास योजना टाळेबंदी सह कोरोना कारणाने उपाययोजना अंमलबजावणी कालावधी पुर्वलक्षी 23 मार्च 2020 पासून वगळून पुढे वाढवून देण्या संदर्भात एम आर टि पी 1966 कलम 148-अ मध्ये पुरक सुधारणा अध्यादेश राज्यपाल यांचे मान्यतेने दि. 31/08/2020 रोजी निर्गमित केलेला आहे. त्यामुळे चाकण नगरपरिषद द्वारा दि. 15/09/2020 ते 29/09/2020 दरम्यान एकुण 796 सुनावण्या घेण्यासाठी आयोजित केले, त्या शासन धोरण विरोधी असून सद्याच्या कमिटीचे कार्यकाल दि. 27/10 /2020 दरम्यान संपुष्टात येत असून निवडणूक आचारसंहिता कालावधी अप्रत्यक्षपणे सुरू झालेला आहे. त्यामुळे एवढ्या घाईघाईने सुनावणी घेण्यास नेमका हेतू काय? कोरोनाचे रूग्ण रोज शहरात 20+ आहेत त्यासाठी नगरपरिषद उपाययोजना करण्यास उदासिनता दाखवत आहे, ही वस्तुस्थिती व भावना शहरातील नागरीकांची आहे.

यासर्व बाबींवर व शासनाने पारीत केलेल्या अध्यादेश हेतूस छेद देणारे वर्तन नगरपरिषद करत असलेले श्री. भुषण गगराणी
अपर मुख्य सचिव तथा प्रधान सचिव, नगर विकास विभाग (१) यांचेकडे लेखी तक्रार दाखल केली असून एक महत्वपूर्ण बाब म्हणजे चाकण नगरपरिषदद्वारा मा. उपविभागीय अधिकारी खेड यांचेकडून सुनावणीसाठी परवानगी घेतली असल्याचे सांगण्यात येते. वास्तविक पाहता मा. मुख्याधिकारी, चाकण नगरपरिषद यांनी नगरविकास (1) म्हणजेच आपणाकडे संदर्भ क्र. 1 अधिकार क्षेत्र असताना ज्या प्राधिकरणाचा काहीएक संबध नाही, त्यांची परवानगी घेणे, तेही संदर्भ क्र. 1 बाबत अवगत असताना घेणे, हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. वास्तविक पाहता निवडणूक आयोग, सार्वजनिक आरोग्य विभाग यांचेसह नगरविकास विभागाकडे पत्रव्यवहार करणे किंवा मा. जिल्हाधिकारी यांचेमार्फत शासनास मार्गदर्शन संदर्भ 1 व 3 सह मागणे आवश्यक होते, तसे त्यांनी जाणीवपूर्वक केलेले नाही.
तरी वरीलप्रमाणे वस्तुस्थिती नमुद केली असून व्यापक जनहित व सार्वजनिक आरोग्य प्रश्न लक्षात घेऊन नगरविकास विभागास प्राप्त अधिकारक्षेत्रानुसार कलम 148-अ अध्यादेश हेतू संवर्धन करण्यासाठी चाकण नगरपरिषद प्रारुप विकास योजना MRTP अधिनियमामध्ये (1966) दि 31 ऑगस्ट 2020 रोजी जारी सुधारणा अध्यादेशानुसार कलम 148 अ मधील सुधारणेनुसार हरकती सूचना सुनावणी कार्यवाही कालावधी वगळून मिळणार असलेने प्रक्रिया तुर्त पुढे ढकलण्याबाबत आदेश तातडीने निर्गमित होणेबाबत विनंती शहर काँग्रेस कमिटीने केली आहे.

चाकण नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी कायदेभंग करून कारभार करू नये, तुर्त कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल – आनंद चांगदेव गायकवाड ( अध्यक्ष, शहर काँग्रेस कमिटी, चाकण)

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 26 Oct 2026

शनिवार, २४ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ सह्याद्रीतील…

15 hours ago

MahaBulletin — 23 Oct 2026

गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 दिवेआगर…

4 days ago

MahaBulletin — 22 Oct 2026

बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजगुरुनगरमध्ये…

5 days ago

MahaBulletin — 20 Oct 2026

सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अन्नपदार्थ…

7 days ago

MahaBulletin — 19 Oct 2026

रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेडमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 18 Oct 2026

गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेड…

1 week ago

This website uses cookies.