महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : खेड तालुक्यातील कोरोना दिवसेंदिवस अनियंत्रित होत असून चाकण नगरपरिषद तर जिल्ह्यातील सर्वात जास्त कोरोना रूग्ण असलेली नगरपरिषद झाली आहे. आज तर चाकणला सर्वाधिक ४५ रुग्ण आढळले आहेेेत. नगरपरिषदच्या तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. नीलम पाटील यांच्या कडक शिस्तीबाबत आजही चाकण शहरात चर्चा आहे.
दि. १५ मे २०२० जिल्हाधिकारी यांनी काही नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीवर त्यांचा कार्यभार काढला, तद्नंतर आळंदी नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी यांना कार्यभार दिला आणि चाकण नगरपरिषद हद्दीत कोरोनाने जो शिरकाव केला तो आता थांबता थांबेना. दरम्यान ६ जून ते ६ जुलै २०२० व २९ जुलै ते ११ आँगस्ट २०२० कालावधीत मॅटच्या आदेशाने त्यांना कार्यभार देण्यात आला होता. त्या दरम्यान त्यांनी चाकण नगरपरिषद हद्दीत कोविड केअर व रुग्णालय यासह अद्यावत रूग्णवाहीका तसेच आरोग्य तपासणी यंत्र प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेकडे सादर केले होते. कार्यभार नसताना त्यांनी दि. २२/०७/२०२० रोजी मा. अजितदादा पवार यांना पत्राद्वारे चाकण व औद्योगिक परिसरातील कोरोना नियंत्रणाबाबत उपाय योजना संदर्भात पत्र लिहिले होते.
त्याच पध्दतीने खेड तालुक्यातील प्रशासन काम करत असल्याचे दिसून येते. परंतु डॉ. नीलम पाटील यांनी सुचविलेल्या पध्दतीने जर अमंल झाला, तर मोठ्याप्रमाणात कोरोना ट्रेनिंग सह नियंत्रण शक्य होईल. चाकण औद्योगिक क्षेत्रातील सर्व कंपनीच्या कामगारांना कामावर आल्यावर कंपनीत प्रवेश देताना पल्स आँक्सीमीटर व डिजिटल थर्मलगन द्वारे शरीराचे तापमान तपासणे, तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती व उपबाजार येथे येणार्या प्रत्येक शेतकरी व व्यापारी यांची वर नमुद तपासणी व नोंदी ठेवणे, औद्योगिक कंपनी व कृषी उत्पन्न बाजार समिती यांचेतर्फे वैद्यकीय भरारी पथके नेमून पर्यायी यंत्रणा तालुक्यात कार्यान्वित करणे व आज रोजी आहे ती आरोग्य यंत्रणा जैसे थे ठेऊन पर्यायी यंत्रणा ही सातत्याने भरारी पथकासारखे गावोगावी, त्यात जी गावे जास्त बाधित त्याठिकाणी प्रथम प्राधान्याने तपासणी व उपचार देण्यासाठी कार्यरत राहिल.
यासह वैद्यकीय दृष्टया व्यवहार्य व अंमलबजावणी करण्यासाठी सुलभ उपाययोजना पत्रात नमुद करण्यात आल्या आहेत. सदर पत्राची दखल व अंमलबजावणी व्हावी, म्हणून स्थानिक जनतेची मागणी आहे. औद्योगिक कंपनी व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडे मुबलक प्रमाणात त्यांच्या पुरते वैद्यकीय उपचारांसाठी पैसे आहेत आणि कोरोना कालावधीत कामगार व शेतकरी यांचेसाठी थोडा पैसा खर्च केला तर नागरिकांना देखील उपचारासाठी ताण येणार नाही.
मुख्याधिकारी डॉ. नीलम पाटील यांनी चाकण नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून चाकण औद्योगिक क्षेत्रातील सर्व कंपनी सूची जोडुन कोरोना संदर्भाने सर्व अत्यावश्यक बाबींबाबत प्रस्ताव तयार केले; परंतु मुदतपूर्व बदली झालेने ते प्रस्ताव प्रलंबित पडले आणि कोरोना चाकण नगरपरिषद हद्दीत अनियंत्रित झाला, अशी आज रोजीची परिस्थिती आहे.
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
This website uses cookies.