महाबुलेटीन न्यूज
चाकण : कोळीये ( ता. खेड ) गावच्या हद्दीत भालसिंगवाडी येथे अवैध गांजा विक्री करणाऱ्यांवर चाकण पोलिसांनी धडक कारवाई करून पावणे ९३ हजार रुपये किंमतीचा साडेतीन किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी एका महिलेसह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई ५ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी सापळा रचून केली. याप्रकरणी राणी महेश जगनाडे ( वय ४०, रा. चाकण बाजारपेठ, सध्या रा. भालसिंगवाडी, कोळीये, ) व सचिन गणपत आवळे ( वय ३२, रा. भालसिंगवाडी, कोळीये, ता. खेड, जि. पुणे ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ १ मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, गुन्हे पोलीस निरीक्षक अनिल देवडे, पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे, स.पो. फौजदार विठ्ठल कुंभार, पोलीस हवालदार सुरेश हिंगे, पोलीस नाईक हनुमंत कांबळे, मच्छिन्द्र भांबुरे, अशोक दिवटे, निखिल वरपे, म.पो.कॉ. सुप्रिया गायकवाड यांनी केली. पोलीस निरीक्षक अनिल देवडे हे पुढील तपास करीत आहेत.
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
This website uses cookies.