गुन्हेगारी

चाकण पोलीसांकडुन अवैध दारू धंदयांवर व हातभटटयांवर धडक कारवाई, १३ जणांवर गुन्हे दाखल, सव्वादोन लाखाचा मुद्देमाल जप्त

चाकण पोलीसांकडुन अवैध दारू धंदयांवर व हातभटटयांवर धडक कारवाई, १३ जणांवर गुन्हे दाखल, सव्वादोन लाखाचा मुद्देमाल जप्त

महाबुलेटीन न्यूज 
चाकण : चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध ठिकाणी पोलिसांनी अवैध दारू धंदे व हातभट्ट्यांवर धडक कारवाई करून १३ आरोपींवर दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींकडून २ लाख २७ हजार ९२५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी दिली.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हददीत अवैध धंदयावर कारवाई करून त्याचे समुळ उच्छाटन करण्याचे आदेश केलेले असुन त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपुत यांनी दिलेल्या सुचना प्रमाणे चाकण पोलीसांकडुन हददीत वेगवेगळया ठिकाणी अवैध दारू धंदयावर तसेच हातभटटयांवर छापे टाकुन धडक कारवाई करत १३ आरोपींवर दारूबंदी कायदया अंतर्गत गुन्हे दाखल करत करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश किसन शिंदे ( वय २७ रा. चाकण, ता. खेड जि. पुणे ), राजु सदाशिव वैदय ( वय ३० रा. भुजबळ आळी चाकण, ता. खेड, जि. पुणे ), राहुल मनोज जयस्वाल ( वय २६ रा. चाकण, ता. खेड, जि. पुणे ), काळुराम राठोड ( रा. गोनवडी, ता. खेड, जि. पुणे ), उमेश बाळु गोरे ( रा. बहुळ, ता. खेड, जि. पुणे ), योगेश सुभाष बडगुजर ( रा. खडीमशीन वाकी बुll, ता. खेड, जि. पुणे ), निलेश नंदकुमार शिंदे ( वय ३० रा. रासे, ता. खेड, जि. पुणे ), सपना गोपी ठाकुर ( रा. नाणेकरवाडी, ता. खेड, जि. पुणे ), पन्यारी अनिल राठोड ( रा. संतोषनगर भाम, ता. खेड, जि. पुणे ), सोमनाथ हिरामण जगताप ( रा. चाकण, ता. खेड, जि. पुणे ), संजय हिरामण कलवडे ( रा. पाळु, ता. खेड, जि. पुणे ), निलेश नंदकुमार शिंदे ( वय ३० रा. रासे, ता. खेड, जि. पुणे ), जतीन फत्ते राजपुत ( वय ६० रा. साबळेवाडी, ता. खेड, जि. पुणे ) या १३ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले.

चाकण पोलीसांनी दिनांक २५/०८/२०२१ पासुन अवैध धंदयावर धडक कारवाई करत गुन्हे दाखल करून १३ आरोपींवर धडक कारवाई करत त्यांचेकडुन सुमारे २,२७,९२५ रु. किंमतीचा दारूचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ – १ मंचक इप्पर, पोलीस उपआयुक्त गुन्हे सहा. पोलीस आयुक्त प्रेरणा कटटे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत तसेच पोलीस निरीक्षक गुन्हे अनिल देवडे, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे यांचे पथकाने केली.
००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

3 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

3 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

4 weeks ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

4 weeks ago

MahaBulletin — 07 May 2026

बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…

1 month ago

MahaBulletin — 06 May 2026

मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…

1 month ago

This website uses cookies.