प्रशासकीय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिमहत्वाची बातमी : चाकण परिसरातील कंपन्यांचा विद्युत पुरवठा शनिवारी बंद : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

कोरोना रुग्णांसाठी चाकण एमआयडीसी पुरवतेय प्राणवायू,
ऑक्सिजन उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी शनिवारी विद्युत पुरवठा बंद,
ऑक्सिजन उत्पादित कंपनीला विद्युत जोडणीसाठी १३२, २२० kv लाईन बंद
शासकीय व खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करण्याचे आदेश

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क : हनुमंत देवकर
पुणे : जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व वाढती रुग्णसंख्या विचारात घेता मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी व भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेता चाकण एमआयडीसीतील एअर लिक्वीड इंडिया होल्डींग प्रा. लिमिटेड या कंपनीस मेडीकल ऑक्सिजन उत्पादन सुरु करणे आवश्यक आहे. येथील एअर लिक्वीड इंडिया होल्डींग प्रा. लिमिटेड कंपनीला विद्युत जोडणी करण्यासाठी परिसरातील इतर कंपन्यांचा विद्युत पुरवठा ठराविक कालावधीकरीता बंद करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.

चाकण एमआयडीसीतील एअर लिक्वीड इंडिया होल्डिंग प्रा. लिमिटेड या कंपनीस मेडीकल ऑक्सीजन उत्पादन सुरु करण्याकरीता एअर लिक्वीड इंडिया या कंपनीस विद्युत जोडणी करण्यासाठी 132 के.व्ही. चिंचवड-चाकण विद्युत वाहिनी, 220 के. व्ही. व्होकसवॅगन ते 220 के. व्ही. चाकण उपकेंद्र ही वाहिनी व 220 के. व्ही. चाकण उपकेंद्रामधून निघणारे सर्व 22 के. व्ही. व 132 के. व्ही. वाहिनीचा पुरवठा दिनांक 15 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत बंद करण्यात येणार आहे.

पुणे जिल्हयात आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कोवीड-19 साथीच्या रोगाच्या नियंत्रणासाठी, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व वाढती रुग्णसंख्या विचारात घेता मेडीकल ऑक्सीजनचा उत्पादन व पुरवठा सुरळीत होण्यासाठी व भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेता एअर लिक्वीड इंडिया होल्डींग या कंपनीस मेडीकल ऑक्सीजन उत्पादन सुरु करणेकरीता हा आदेश पारीत करण्यात आला आहे.

चाकण एमआयडीसीतील आयनॉक्स एअर प्रॉडक्ट्स प्रा. लि. व टायोनिपॉन सॅनसो इंडिया प्रा. लि. या कंपन्यांच्या मेडीकल ऑक्सीजन उत्पादनावर देखील या विद्युत पुरवठा बंद कालावधीचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयनॉक्स एअर प्रोडक्टस प्रा. लि. व टायोनिपॉन सॅनसो इंडिया प्रा. लि. यांनी सध्या होत असलेला मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा दिनांक 15 ऑगस्ट 2020 रोजी व तद्नंतर देखील विनाअडथळा सुरळीत राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना या आदेशान्वये देण्यात आल्या आहेत. या दिवशी ज्या रुग्णालयांना ते मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा करतात, त्यांच्याशी मागणी बाबत समन्वय ठेवून आवश्यक तो मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा करावा. कोणत्याही परिस्थीतीत रुग्णांची गैरसोय होणार नाही याबाबतची जबाबदारी संबंधित कंपन्यांची राहिल.

एअर लिक्वीड इंडिया होल्डींग प्रा. लिमिटेड ही कंपनी इतर राज्यात मेडीकल ऑक्सीजनचे उत्पादन करीत असल्याने त्यांनी बंद कालावधीमध्ये मेडीकल ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत सुरु राहण्यांकरीता आयनॉक्स एअर प्रोडक्टस व टायोनिपॉन सॅनसो इंडिया यांच्याशी समन्वय साधून मेडीकल ऑक्सीजन पुरवठा करण्याची जबाबदारी एअर लिक्वीड इंडिया होल्डिंग यांची राहील. त्यापुढे पुणे शहरातील व जिल्हयातील शासकीय रुग्णालये व इतर रुग्णालये यांना मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा नेहमीप्रमाणे सुरळीत राहील, याची जबाबदारी आयनॉक्स एअर प्रोडक्टस प्रा. लि. व टायोनिपॉन चाकण यांची राहील. एअर लिक्वीड इंडिया होल्डींग प्रा. लिमिटेड या कंपनीस विद्युत जोडणी करण्याकरीता दिलेल्या वेळेत काम पूर्ण करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीची राहील.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय साथ रोग नियंत्रण नियम 1897 तसेच भारतीय दंड विधान 1860 चे कलम 188 प्रमाणे सर्व संबंधित दंडनिय कार्यवाहीस पात्र राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
=====

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Aug 2026

गुरुवार, ६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकणमधील…

19 hours ago

MahaBulletin — 06 Aug 2026

बुधवार, ५ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघात…

2 days ago

MahaBulletin — 04 Aug 2026

सोमवार, ३ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Aug 2026

रविवार, २ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 धरण…

5 days ago

MahaBulletin — 02 Aug 2026

शुक्रवार, ३१ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आज…

6 days ago

MahaBulletin — 31 Jul 2026

गुरुवार, ३० जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

1 week ago

This website uses cookies.