विधायक

चाकण परिसरात महिलांनी वडाच्या झाडाचे रोपटे एकमेकांना भेट देऊन वटपौर्णिमा साजरी केली. ● औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना वटपौर्णिमा, नागपंचमी व रक्षाबंधन या सणांसाठी पगारी सुट्ट्या द्याव्यात : मंगलताई देवकर

चाकण परिसरात महिलांनी वडाच्या झाडाचे रोपटे एकमेकांना भेट देऊन वटपौर्णिमा साजरी केली.
● औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना वटपौर्णिमा, नागपंचमी व रक्षाबंधन या सणांसाठी पगारी सुट्ट्या द्याव्यात : मंगलताई देवकर

महाबुलेटीन न्यूज
चाकण : निसर्ग आनंदाने डोलत वर्षाराणीची आतुरतेने वाट पाहत असतो. अशा सुरेख समयी डौलदारपणे येते वटपौर्णिमा. हा महिलांचा वर्षातला एक आनंदाचा पारंपारिक सण… याच सणाला झाडांचे महत्व लक्षात घेऊन महिलांनी वडाच्या झाडाचे रोपटे एकमेकांना भेट देऊन चाकण परिसरात वटपोर्णिमा साजरी केली.

या दिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करतात. सात जन्माचे प्रतिक म्हणून सुताचे सात धागे वडाभोवती गुंडाळून हाच पती सात जन्म मिळो, अशी त्याची प्रार्थना करतात. आपल्या पूर्वजांनी मानवी आयुष्यातले निसर्गाचे महत्व ओळखून त्याची पूजा सुरु केली. ज्या पंचमहाभूतामुळे पृथ्वीवर सजीवसृष्टी जन्माला आली. त्याप्रमाणेच निसर्गातील सर्व सजीव-निर्जीव सृष्टीची मानवाला आवश्‍यकता आहे.

चाकण परिसरात महिलांनी वटपोर्णिमा निमित्त वटवृक्ष रोपटे भेट देऊन त्याच वडाची पुजा केली. प्रत्येक महिलेने झाडाची पुजा करुन सात फे-यांबरोबर वृक्ष संगोपनाचाही संकल्प केला पाहिजे, असे महिला लैंगिक शोषण तक्रार केंद्रीय समितीच्या ( NDRF ) सदस्या मंगलताई देवकर यांनी सांगितले.

दरम्यान आपलेही सावित्रीसारखे सौभाग्य अखंडीत रहावे म्हणून, आजही महिला वडाची पूजा करतात. त्याच पद्धतीने जंगलाचेही संरक्षण आपण करण्यासाठी आजच्या दिवशी प्रत्येक महिलेने वन संवर्धनाचा संकल्प केला पाहिजे, असे आवाहन महिलांच्या वतीने करण्यात आले.

चाकण परिसरातील खराबवाडी, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी व कडाचीवाडी आणि इतर वाड़या वस्त्यांवर वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. विशेषतः महिला सुवासिनींनी वडाच्या झाडाला सात फेरे मारून वडाची मनोभावे पूजा केली.

सौ. मंगलताई देवकर

औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना वटपौर्णिमा, नागपंचमी व रक्षाबंधन या सणांसाठी पगारी सुट्ट्या द्याव्यात : मंगलताई देवकर
चाकण परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्र असल्याने विशेषतः कामगार वर्गातील महिलांनी सकाळी कामावर जाण्यापूर्वीच आपापल्या भागात वडाचे पूजन करून कामावर गेल्या. येथील औद्योगिक कंपन्यांमध्ये मोठ्य्या प्रमाणावर महिला कामगार व कर्मचारी काम करीत असून वटपौर्णिमा या महिलांच्या सणाला सुट्टी नसल्याने महिलांमध्ये नाराजी दिसून येत होती. पुढील वर्षापासून तरी शासनाने वटपौर्णिमा, नागपंचमी व रक्षाबंधन ह्या सुट्ट्या आद्योगिक क्षेत्रासाठी लागु कराव्यात, अशी मागणी महिलांच्या वतीने महिला लैंगिक शोषण तक्रार केंद्रीय समितीच्या ( NDRF ) सदस्या मंगलताई देवकर यांनी केली आहे.
===========================

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

15 hours ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

4 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

1 month ago

This website uses cookies.