जयंती

महाबुलेटीन न्यूज : चाकण मध्ये शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी, ठाकरे यांना अभिवादन करून रुग्णांना फळे वाटप…

 

महाबुलेटीन न्यूज
चाकण : शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट, सरसेनापती, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना चाकण शहर पदाधिकार्‍यांच्या वतीने स्व. बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहण्यात आली. 

खेड तालुकाप्रमुख तालुका प्रमुख रामदास आबा धनवटे यांचे नेतृत्वाखाली तालुक्यातील प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.
खेडचे माजी आमदार स्व. सुरेशभाऊ गोरें यांचे बंधू नितीन गुलाबराव गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, चाकण शहरातील उद्योजक, मा. ग्रा. पं. सदस्य बाळासाहेब साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली, शिवसेना चाकण शहरप्रमुख महेश शेवकरी यांच्या नेतृत्वाखाली चाकण शहरातील शिवसेना शाखेत स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे समस्त पदाधिकार्‍यांच्या वतीने प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. तसेच चाकण येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.

यावेळी शिवसेना चाकण उपशहरप्रमुख स्वप्निल बिरदवडे, राजेंद्र खेडकर, अभिजीत जाधव, शेखर नाना पिंगळे, पांडुरंग गोरे, स्वामी कानपिळे, अनिल गंभीर, श्याम राक्षे, तसेच महिला आघाडीच्या कविताताई करपे, गितांजलीताई भस्मे, शारदाताई कोरगावकर, प्रभावती साळुंखे आदी कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 28 Apr 2026

सोमवार, २७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भामास्केट…

8 hours ago

MahaBulletin — 27 Apr 2026

रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…

1 day ago

MahaBulletin — 27 Apr 2026

शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…

1 day ago

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

4 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

1 week ago

This website uses cookies.