महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
चाकण : जगभरामध्ये कोरोनाव्हायरस थैमान घातले असून भारतातही मोठ्या प्रमाणात या व्हायरसने आपले हात-पाय पसरले आहेत. प्रसार माध्यमे व सोशल मिडियाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरस विषयी जनजागृती होत आहे. पण अनेक लोक याकडे अजुनही गांभीर्याने पाहत नसल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शासन पातळीवर प्रयत्न होत असले, तरीही जोपर्यंत नागरिकांमध्ये जनजागृती होत नाही, तोपर्यंत या आजाराला रोखणे कठीण आहे.
देशात वाढत्या कोरोना रुग्णांचे संक्रमण रोखण्यासाठी मोठया प्रमाणावर विविध उपक्रमांतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी चाकण येथील महिंद्रा हेवी इंजिन्स लि., यश फौंडेशन व चाकण ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” आरोग्य रथाचे आयोजन केले आहे.
सदर अभियानामध्ये कोरोनाची लक्षणे, सुरक्षित अंतर ठेवा, मास्कचा वापर करा, कोरोना पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काळजी कशी घ्यावी, कुटुंबाची काळजी कशी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, गर्दी टाळावी, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, सॅनिटायझरचा वापर करा, हात वारंवार साबण व पाण्याने धुवावे, रस्त्यावर थुंकू नये, प्रशाशनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे इत्यादी माहिती व इतर महत्वाच्या सूचना या आरोग्य रथाद्वारे नागरिकांपर्यंत बॅनर्स, चित्रांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे आयोजन केले आहे. सदर कोरोना आरोग्य रथ विविध गावागावांमध्ये जाऊन नागरिकांना जनजागृती करणार असून कोरोना मुक्त भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
सदर आरोग्य रथाचे उद्घाटन रिबिन कापून व हिरवा झेंडा दाखवुन ग्रामीण रुग्णालयाच्या प्रांगणात करण्यात आले. यावेळी श्री कमलप्रीत सिंग, श्री संजय मते, श्रीमती शुभा नायर, महिंद्रा हेवी इंजिन्स लि. चाकण अधिकारी वर्ग, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनंदा ढवळे, यश फौंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील तसेच यश फौंडेशन व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२० या कालावधीत खेड,आळंदी व चाकण परीसरातील विविध गावे, ग्रामपंचायत, वस्ती, बाजारपेठ, बसस्थानक आदी ठिकाणी विविध घोष-वाक्य, चित्र-फीत, चित्र प्रदर्शन, भिंती चित्रीकरण माध्यमातून कोरोना विषयी जनजागृती करण्यात येणार आहे.
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.