आरोग्य

चाकण ग्रामीण रुग्णालयातील ३१ कोरोना योद्ध्यांचा विशेष गौरव

कोरोना काळातील आरोग्य सेवकांचे योगदान हे देशासाठी प्रेरणादायी : डॉ. असित अरगडे

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
चाकण : “कोरोना काळामध्ये डॉक्टर्स व आरोग्य सेवकांचे योगदान हे देशासाठी प्रेरणादायी आहे”, असे प्रतिपादन स्त्री रोग तज्ञ डॉ. असित अरगडे यांनी केले.

चाकण येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, परिचारिका, रुग्णवाहिका चालक आदी ३१ कोरोना योद्ध्यांचा पुणे येथील काव्यमित्र संस्थेच्या वतीने गुलाबपुष्प व सन्मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.

यावेळी चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. एन. जी. ढवळे, प्रमुख पाहुणे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष हभप. मुक्ताजीदादा नाणेकर, प्रसूती तज्ञ डॉ. असित अरगडे, जेष्ठ पत्रकार हनुमंत देवकर, काव्यमित्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सगर, आदी मान्यवर उपस्थित होते. संदीप कोंपले व प्रतिमा आघार्डे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.

चाकण ग्रामीण रुग्णालयातील कोरोना योद्ध्यांचा गौरव…

कोरोना योद्धा सन्मानाचे मानकरी :  वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन. जी. ढवळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. आर. पाटील, डॉ. पी. पी. इंगळे, डॉ. एस. के. गुट्टे, डॉ. अश्विनी बिंधे, डॉ. राजेंद्र देसाई, श्री जे. के. उनवणे, डी. डी. भागवत, एस. आर. गोजे, सौ. ए. यु. इंगोले, एस के सुपेकर, एम. बी. सुतार, एस. आर. भोर, एन. वाय. कांबळे, व्ही. के. ढाक, ए. एस. ढमाले, ए. एम. चांदणे, जी. डी. सोळंके, श्री. एस. आर. नायकोडी, विलास भवरे, आसिफ शेख, ए. टी. साळवे, सत्यवती पुंडे, के. सी. शिंदे, बी. डी. भांडवलकर, ए. एस. मांदळे, ए. एस. दिसवड, मनीषा पवार, निलेश क्षीरसागर, ज्ञानेश्वर हिवराळे, मारोती राजगुरू यांच्यासह ३१ आरोग्य सेवकांना गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

कवी गणेश पुंडे व संतोष नायकोडी यांनी सूत्रसंचालन केले, तर जे. के. उनवणे यांनी आभार मानले.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 28 Apr 2026

सोमवार, २७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भामास्केट…

2 days ago

MahaBulletin — 27 Apr 2026

रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…

3 days ago

MahaBulletin — 27 Apr 2026

शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…

3 days ago

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

1 week ago

This website uses cookies.