महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर भाजपाचे जेष्ठ नेते वसंत वाणी (वय- ७६) यांचे मंगळवार ( दि. १५ सप्टेंबर ) सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते वसंत उर्फ दादा वाणी यांचे निधन शहरातील जुन्या कार्यकर्त्यांसाठी धक्का आहे.
एक धडाडीचा संघटक, पिंपरी चिंचवडला भाजपा उभारणीत मोलाची कामगिरी करणारा, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा एक निस्सिम स्वंयसेवक असा त्यांचा परिचय आहे.
आणीबाणीत १९ महिने नाशिक जेल मध्ये स्थानबद्ध राहिले होते. कै. प्रमोद महाजन, कै. गोपीनाथ मुंडे, मा. मंत्री नितीन गडकरी यांच्या अत्यंत विश्वासतील म्हणुन त्यांची गणना केली जाते.
पिंपरी चिंचवड नवनगर पालिकेचे पहिले नगरसेवक (१९७८) म्हणुन निवडुन येऊन त्याची राजकीय कारकिर्द सुरु झाली. प्राधिकरण सदस्य म्हणुनही त्यांनी काम केले. भाजपाचे राज्य कार्यकरनी सदस्य महेश कुलकर्णी म्हणाले, ”सतत कार्यकर्ता उभारणीच्या कामात व त्या जडण घडणीत त्यांचा प्रयत्न होता.
नेहमीच ध्यास घेवुन पक्ष विस्ताराच्या कामात शहरातील कार्यकर्त्यांच्या भावनेशी एकरुप झालेला लढवय्या नेता आज आपल्यातुन गेला. ही जिवाला चटका लावणारी घटना आहे.
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…
मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…
This website uses cookies.