महाबुलेटीन न्यूज
तळेगाव दाभाडे : कान्हे ( ता. मावळ ) येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या वेअर हाऊसच्या आवारात बिबट्या आढळला. हा बिबट्या कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कंपनीच्या आवारात बिबटयाचा वावर आढळल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली असून वनविभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्याचे काम सुरु आहे. जंगल सोडून बिबट्या आता कंपन्या व लोकवस्तीत आढळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बिबट्या वेअर हाऊसमध्ये आल्याचे लक्षात येताच एच. आर. मॅनेजर विजय पवार यांनी सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून व्हीडीओ क्लीप काढून सरपंच विजय सातकर व पोलीस पाटील शांताराम सातकर यांना पाठवून नागरीकांना याबाबत माहिती दिली. लागलीच घटनास्थळी सरपंच विजय सातकर व पोलीस पाटील शांताराम सातकर व ग्रामस्थ हजर झाले.
या घटनेसंदर्भात अधिक माहिती जाणून घेता सरपंच विजय सातकर यांनी आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून वन विभाग अधिका-यांना कळविल्याचे सांगितले.
बिबट्या दिसून आल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांना दक्ष व सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. mahabulletin.com
बिबट्याला पकडण्यासाठी वनखात्याच्या विभागामार्फत उपाय योजना करण्यात येत आहे. अशी माहिती कान्हे ( Mawal ) ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच विजय सातकर यांनी mahabulletin news la दिली.
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.