महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
भोर : कोरोनामुळे क्वारंटाईन केलेल्या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडले. शहरातील भोई आळी येथील घरातील ५ जण कोरोना बाधीत असल्याने कोविड सेंटरमध्ये उपचार घेत होते. यावेळी त्यांचे घर बंद होते. याचा फायदा घेत मंगळवार ( दि. ११ ) रोजी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सोन्याच्या दागिने व रोख रक्कम असा ऐकून २ लाख ६ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनीष नितीन दळवी रा.भोई आळी यांचे चुलते कोरोना बाधीत असल्याने घरातील सर्व लोकांना उपचारासाठी प्रशासनाने आयटीआय येथे ठेवले होते. घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे पत्रे काढून कोरोना बाधितांच्या घरात चोरी केली. यावेळी घरातील सामानाची चोरट्यांकडून नासधूसही करण्यात आली. चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. पोलीस निरीक्षक राजू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुभाष गिरे, उद्धव गायकवाड, आप्पा हेगडे, अनील हिप्परकर हे पुढील तपास करीत आहेत.
चोरीच्या तपासासाठी भोरला डॉग स्कॉड
————————————————–
भोर येथे झालेल्या चोरीच्या तपासासाठी डॉग स्कॉड दाखल झाले असून या चोरट्यांचा तपास कधी लागणार किंवा लागणार की नाही ? असे प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहेत. तर जबरी चोरीमुळे भोर शहर व ग्रामीण भागातील क्वारंटाईन नागरिक भयभीत झाले आहेत.
——–
बुधवार, १८ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे जिल्हा परिषद…
मंगळवार, १७ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा…
पुणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका पुन्हा एकदा समोर आला आहे, चाकण येथे एका 32…
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
This website uses cookies.