भांबोलीच्या सरपंचपदी भरत लांडगे यांची बिनविरोध निवड

भरत लांडगे

महाबुलेटीन नेटवर्क / दत्ता घुले 

शिंदे वासुली : भांबोली ( ता.खेड ) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भरत भिमाजी लांडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक अधिकारी दीपक मडके यांनी दिली. रिक्त झालेल्या सरपंच पदाची पोटनिवडणूक आज ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली.
मावळते सरपंच सागर निखाडे यांनी स्वखुषीने राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. तसेच शासनाच्या नवीन नियमानुसार आता सरपंच निवड सदस्यांतून होणार असल्याने मोठी चूरस वाढली होती. परंतु आज झालेल्या निवडणुकीत सरपंचदासाठी निर्धारित वेळेमध्ये भरत लांडगे यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्यामुळे लांडगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. यावेळी ग्रामपंचायत सभागृहामध्ये सहा सदस्यांपैकी भरत लांडगे, देविदास राऊत, स्वाती वाडेकर व कांताबाई निखाडे हे चार सदस्य उपस्थित होते.
यावेळी मावळते सरपंच सागर निखाडे, उपसरपंच देविदास राऊत, पोलीस पाटील दिपक राऊत, हेड कॉन्स्टेबल विलास गोसावी, अमोल बोराटे आदि उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडलाधिकारी दिपक मडके यांनी काम पाहिले. ग्रामसेवक काकासाहेब मिंड व गावकामगार तलाठी राजेंद्र वडणे यांनी त्यांना सहकार्य केले. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दत्तात्रय लांडगे, नंदू निखाडे, अरुण लांडगे, ज्ञानेश्वर राऊत आदिंनी विशेष प्रयत्न केले.
admin

Recent Posts

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 hours ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

This website uses cookies.