बैल नसल्याने शेतकर्‍याने दुचाकीला जोडले कोळपे

महाबुलेटीन नेटवर्क / ओमप्रकाश तांबोळकर
लातुर : सध्याच्या महागाईच्या काळात शेती करणे एक आव्हान आहे. दरवर्षी येणारी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीतून येणारे उत्पन्न आणि त्यासाठी झालेला खर्च यांचा ताळमेळ घालणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यानेही आता पारंपरिक पद्धतीने शेती करणे सोडून आधुनिकतेची कास धरली आहे. यातही काही सृजनशिल शेतकरी वेळ व पैसा वचविण्यासाठी नवनवीन आयडिया शोधून काढत आहेत.  लातुर जिल्ह्यातील येरोळ ( ता. शिरूरअनंतपाळ ) येथील तरुण शेतकरी महालिंग सिंदाळकर याने आपल्या शेतातील सोयाबीनचे पीक कोळपण्यासाठी अशीच एक शक्कल लढविली आहे.
शेतात पिकांची कोळपणी ही बैलांच्या सहाय्याने पारंपरिक पद्धतीने केली जाते. मात्र, महालिंग सिंदाळकर यांनी बैलांचा उपयोग न करता कोळपे यंत्र मोटरसायकलला बांधून कोळपणी सुरू केली आहे. कसलाही पैसा खर्च न करता मोटार सायकलच्या सिटवर जुवासारखे लाकडी दांडी बांधुन त्याला दोन दुंडे बांधले. व पाठीमागे दोघांनी दुंडे धरूण कोळपणी सुरू केली. अत्यंत किफायतशीर व कोळपणी योग्य असलेले कोळपे मोटरसायकलला जोडून सोयाबीनच्या पिकांची कोळपणी केली. त्यांच्या या आयडियाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली असून अनेक शेतकरी त्यांचे अनुकरणही करीत आहेत. या तंत्रामुळे कमीत कमी वेळेत कोळपणी होते. शेतकऱ्यांना हे मोटार सायकला परवडणारे असून यामुळे वेळेचीही बचत होते. यामुळे पिकांचे नुकसानही होत नाही, असे कृषी सहाय्यक ओम अंधारे यांनी सांगितले.
admin

Recent Posts

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

1 week ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

2 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

2 weeks ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

2 weeks ago

MahaBulletin — 07 May 2026

बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…

3 weeks ago

MahaBulletin — 06 May 2026

मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…

3 weeks ago

This website uses cookies.