शैक्षणिक

उपक्रमशील शिक्षक म्हणून अविनाश घोलप यांचा सन्मान

 

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
घोडेगाव : अध्यपनाबरोबरचं पालकांच्या हिताचे उपक्रम राबविणे हे आपले कर्तव्य समजणारे शिक्षक अविनाश घोलप यांना ‘सकाळ’ माध्यम समूहाने ‘उपक्रमशील शिक्षक‘ म्हणून सन्मानित केले आहे. सकाळ समूह नेहमीच विधायक उपक्रमात सहभागी होत आहे. खेडेगावातील शिक्षकांच्या कार्यकर्तृत्वाची परिपूर्ण माहिती समाजापर्यंत पोहचविण्याचे काम सकाळ समूहाने उपक्रमशील शिक्षक या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे. हे पुस्तक म्हणजे गुरुजनांचा सन्मान आहे. 

रोहोकडी ता. जुन्नर येथील अविनाश घोलप हे अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा फुलवडे येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून आदिवासी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून अध्यपना बरोबरच ते त्या परिसरात अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात. वाढदिवस असो किंवा इतर कोणत्याही कार्यक्रम असो तो या विद्यार्थ्यांबरोबर साजरा करतात. त्याप्रसंगी ते या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य तसेच खाऊवाटप सातत्याने करत असतात. त्यामुळेच सकाळ समूहाने त्यांचा कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित केले असल्याचे मत जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले यांनी यावेळी व्यक्त केले.

घोलप यांना सन्मानपत्र व पुस्तकाचे वितरण पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य मा. मोहित ढमाले, पंचायत समिती जुन्नरचे सभापती विशाल तांबे, प्रसिद्ध उद्योजक जालिंदर पानसरे, सकाळ वृत्तपत्राचे ओतूर प्रतिनिधी पराग जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 hours ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

This website uses cookies.