खरेदी-विक्री

औद्योगिकरणामुळे चाकणला ज्वारी काढणीस मजूर मिळेना… चाकण एमआयडीसी परिसरातील चित्र…. शेतकऱ्यांची होतेय धावपळ

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण : खेड तालुक्यातील अनेक गावांत रब्बी हंगामातील ज्वारी काढणीस सुरुवात झाली असून हे काम करण्याकरीता मजूर उपलब्ध होत नाहीत. चाकण एमआयडीसीतील औद्योगिकरणामुळे अनेक गावांत मजुरटंचाईची समस्या भेडसावत आहेत. मजुरांच्या टंचाईमुळे शेतकरी मजुरांचा शोध घेतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे वाढीव मजुरी देत शेतकरी ज्वारीची काढणी करत आहेत. उन्हातान्हाची तमा न बाळगता मजूर भर उन्हात ज्वारी काढणी व कणसं कापणी करीत आहेत. कारखान्यांमध्ये सावलीत काम असल्याने महिला कामगार कमी पगार मिळाला तरी कारखान्यात काम करणे पसंत करतात, त्यामुळे शेतकऱ्यांना मजूर टंचाई जाणवत आहे.

ढगाळ वातावरणाचा ज्वारीच्या पिकावर विपरीत परिणाम झाल्याने उत्पादनात घट आली आहे. सध्या ज्वारीच्या काढणीला सुरूवात झाली, असून उत्पादनात झालेली घट व मजुरांचे गगनाला भिडलेले दर यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जास्त दराने रोजंदारी देऊनही मजूर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आल्याचे चित्र दिसून येत आहे.

* शेतकऱ्यांना उत्पादनात घट :-

वारंवार होणाऱ्या हवामानातील बदलाचा ज्वारी पिकाला फटका बसला आहे. पावसाच्या लांबणीमुळे ज्वारी पेरणीस उशिर झाला त्यातच ज्वारीची उंची मोठ्या प्रमाणावर वाढली परंतु बहुतांश ठिकाणी कणसामध्ये दाणेच भरले नाहीत. चाकण परिसरात कारखानदारीतून निर्माण होणाऱ्या प्रदूषणामुळे उत्पादनात घट झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

ज्वारीची पिकाची उंची भरपूर वाढल्याने ती काढण्यासाठी शेतकऱ्यांना कठीण होत आहे. त्यामुळे मजूर या कामासाठी टाळाटाळ करत आहे. थोडेफार जो मजूरवर्ग येत आहे तो जास्त रोजगार मागत आहे. काही मजूर रोजगाराऐवजी ज्वारी काढणीस तीन ते चार हजार रुपये एकरने गुत्ते घेत आहेत.

मजुरी व ज्वारी काढणीस येणारा खर्च याचा विचार केला असता ज्वारीचे उत्पादन परवडत नाही; परंतु उन्हाळ्यात जनावरांना चारा ज्वारीच्या कडब्यापासून मिळत असल्यामुळे व वर्षभर धान्य लागत असल्याने शेतकरी ज्वारी पीक घेत आहेत. ज्वारी काढणीस मजूर आपल्या शेतात यावेत म्हणून शेतकरी सकाळ-संध्याकाळ मजुरांच्या घराकडे हेलपाटे मारत असल्याचे दिसून येत आहेत. शेतकरी मजूर वर्गांना खुश ठेवण्यासाठी जास्त मजुरी देऊन खुश करत आहेत. सध्या मजुरांना तीनशे ते चारशे रुपये मजुरी दिली जात आहे. तसेच काही ठिकाणी मजुरांना शेतात ये-जा करण्यासाठी वाहनांची सोय करावी लागते.

MahaBulletinTeam

Share
Published by
MahaBulletinTeam

Recent Posts

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

MahaBulletin — 23 Aug 2026

शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 weeks ago

This website uses cookies.