महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : रस्ते , साधन – सुविधा व आस्थापना मनसे खेड तालुक्याच्या वतीने वीज वितरण कंपनीला जास्त विज बिल कमी व्हावे तसेच लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ व्हावे, कोणाचीही वीज कनेक्शन कट करु नये, वारंवार वीजपुरवठा खंडित होणे आदी संदर्भात निवेदन देण्यात आले.
वीज वितरण कंपनीने मनसे रस्ते साधन सुविधा व आस्थापना च्या निवेदनाची दखल घेतली नाही, तर मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
जिल्हा अध्यक्ष जगदीश वाल्हेकर व मनसे नेते अभय वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रस्ते आस्थापना खेड तालुका अध्यक्ष दत्ता परदेशी यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कंपनी च्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच संपूर्ण चाकण शहर सॅनिटाईझ करण्याबाबत चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी मनसे नेते अभय वाडेकर, दत्ता परदेशी, नगरसेवक प्रवीण गोरे, रस्ते आस्थापना सोशल मिडियाचे भरत बच्चे, चाकण शहर अध्यक्ष संतोष काळे, मनसे चाकण शहर संघटक भानुदास सागर व मनसैनिक उपस्थित होते.
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…
मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…
This website uses cookies.