..अन्यथा आपली सुशिक्षीत बेरोजगार म्हणून नावनोंदणी होईल रदद

सुशिक्षीत बेरोजगार म्हणून नावनोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपल्या नोंदणी क्रमांकास आधार क्रमांक जोडून नोंदणी अद्यावत करावी : सहायक आयुक्त अनुपमा पवार
महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
पुणे : सुशिक्षीत बेरोजगार म्हणून नावनोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपल्या नोंदणी क्रमांकास आधार क्रमांक जोडून नोंदणी अद्यावत करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.
ज्या उमेदवारांनी शासनाच्या पूर्वीच्या रोजगार व स्वयंरोजगार व सध्याच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या कार्यालयात यापूर्वी सुशिक्षीत बेरोजगार म्हणून नावनोंदणी केलेली आहे, परंतू अद्याप आपल्या नोंदणीचे अपडेशन व आपल्या नोंदणी क्रमांकास आपला आधार क्रमांक जोडलेला नाही अशा सर्व उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाइट वर जावून Job Seeker option मध्ये आपला नोंदणी क्रमांक व पासवर्ड टाकून नोंदणी अद्यावत करावी. अन्यथा आपली नोंदणी 15 ऑगस्ट 2020 अखेर रदद होईल.
अपडेशन अभावी आपली नोंदणी रद्द झाल्यास आपणास या विभागामार्फत मिळणा-या सुविधांचा भविष्यात लाभ घेता येणार नाही. तरी तात्काळ आपली नोंदणी 15 ऑगस्ट 2020 पूर्वी अद्यावत करावी, असेही आवाहन सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

22 hours ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

4 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

1 month ago

This website uses cookies.