दिन विशेष

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त सोशल मिडियाच्या माध्यमातून ऑनलाईन जागृती

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त सोशल मिडियाच्या माध्यमातून ऑनलाईन जागृती

 

महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
पुणे : आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधुन पुणे जिल्हयात युवा पिढीमध्ये एचआयव्ही/एड्स विषयी अभियान वेगवेगळया उपक्रमातून महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई अंतर्गत, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, पुणे मार्फत महाविदयालयातील विद्यार्थ्यांना वेबिनारद्वारे एचआयव्ही /एड्स व कोव्हिड -19 या विषयी दि. 13 व 19 ऑगस्ट 2020 रोजी जनजागृती करण्यात आली.

तसेच कोव्हिड -19 च्या महाराष्ट्र शासनाच्या कोव्हिड-19 संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून ऑनलाईन पद्धतीने 12 ते 27 ऑगस्ट 2020 दरम्यान सोशल मिडीयाच्या ( Facebook, Twitter, Instagram, Whatsapp etc. ) माध्यमातुन जनजागृती, महाविद्यालयाद्वारे ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन, ऑनलाईन पोस्टर स्पर्धाचे आयोजन, रक्तदान शिबिरे स्थानिक चॅनेल स्कॉलद्वारा जनजागृती, तसेच रेड रिबन क्लब मापर्फत सोशल मिडीयाचा वापर करफन जनजागृती करण्यात येणार आहे.

युवा भारत- स्वस्थ भारत, जागरूक भारत- निरोगी भारत – आपल्या नजीकच्या सरकारी रुग्णालयात एचआयव्ही तपासणी व उपचार मोफत व गोपनीय आहे. काही शंका असल्यास हेल्पलाईन क्र. 1097 वर संपर्क करावा. तसेच प्लेस्टोअरमध्ये जाऊन नॅको अॅप डाउनलोड करावे व विविध कार्यक्रमात युवकांनी सहभागी व्हावे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. प्रसाद सोनवणे यांनी आवाहन केले आहे. सदर युवा दिन कार्यक्रमाचे समन्वय व नियोजन श्री. मारोती गायकांबळे, सुधीर सरवदे यांनी केले व श्रीमती आशा भट्ट अध्यक्षा मंथन फाउंडेशन व श्री अनिल बोरकर रिलिफ फाउंफडेशन यांचे सहकार्य लाभले.

“12 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणुन साजरा केला जातो. युवा वर्ग हा एचआयव्ही/एड्स संदर्भात अधिक संवेदनशिल असून त्यानिमित्ताने युवा वर्गामध्ये एचआयव्ही/एड्स संदर्भात जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे. यंदा युनायटेड संघटनेचे युवादिन विषयीचे Youth Engagement for Global Action (जागतिक घडामोडीमध्ये युवकांची प्रतिबध्दता/सहभाग) हे घोषवाक्य आहे. युवा वर्ग सर्जनशील असल्यामुळे विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्यात जागृती निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.”

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

2 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

2 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

3 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

4 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

5 days ago

This website uses cookies.