मावळ

अण्णांनी केले सहपत्नीक जलपूजन…

मावळचे आमदार सुनील शेळके यांचे सहपत्नीक पवनामाई जलपूजन…

महाबुलेटीन न्युज / तुषार वहिले
वडगाव मावळ : मावळ तालुका तसेच पिंपरी चिंचवडकरांची तहान भागवणारे पवना धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. मावळ तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या, कृषीक्रांतीसाठी वरदान ठरलेल्या पवनामाईचा जलपूजन समारंभ आमदार सुनिल शेळके व त्यांच्या पत्नी सौ. सारिका शेळके यांच्या शुभहस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आज पार पडला.

पावसाने सुरुवातीच्या काळात मावळला प्रतिक्षा करायला लावली, परंतु नंतर समाधानकारक पाऊस झाल्याने सर्व नागरिक व शेतकरी समाधानी आहे. पवना व मावळ यांचे अतूट नाते आहे.

यावेळी आमदार सुनिल आण्णा शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, सभापती बाबुराव वायकर, जिल्हा परिषद सदस्या शोभाताई कदम, कुसुमताई काशीकर, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, राजश्रीताई राऊत, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, संत तुकाराम साखर कारखाना संचालक नरेंद्र ठाकर, ज्येष्ठ नेते महादुभाऊ कालेकर, अंकुश आंबेकर, चंद्रकांत दहिभाते, संजय मोहोळ, मा. सरपंच सोमनाथ वाघोले, सागर घाडगे, मा. चेअरमन अनिल तुपे, नामदेव ठुले, माऊली निंबळे, बाळु आडकर, भीमराव मोहोळ, विशाल वहिले आदी पदाधिकारी, सहकारी, स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.