अॅम्बुलन्स आणि दुचाकी अपघातात खेड तालुक्यातील दोन तरुण जागीच ठार
महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : पुणे–नाशिक महामार्गावर अॅम्बुलन्स आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
आतिष नंदकिशोर सोमवंशी (वय २३, रा. दोंदे, ता. खेड, जि. पुणे ) व मयूर अशोक पवळे (वय २३. रा. चांडोली, ता. खेड) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. राजगुरुनगर शहरालगत पुणे–नाशिक महामार्गावर शासकीय विश्रामगृहाजवळ दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅम्बुलन्स नाशिकच्या बाजूने पुण्याच्या दिशेने चालली होती. समोरून आलेल्या दुचाकीची चालकाच्या बाजूने धडक झाली, त्यात काही फुट अंतर दुचाकी ओढत गेली, यामध्ये दुचाकीवर असलेल्या दोन युवकांचा रस्त्यावर पडून गंभीररित्या जखमी होऊन जागीच मृत्यू झाला.
अॅम्बुलन्स चालक महेश चंद्रकांत बालकोळी (रा. पोखरी, ता. आंबेगाव, जि. पुणे ) यांनी खेड पोलिसांना अपघाताची माहिती दिली. खेड पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहे.
पुणे–नाशिक महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे. मानवी चुकांमुळे व वाहतुकीचे नियम न पाळल्याने बहुतांश अपघात होत असल्याचं दिसून येत आहे.
0000
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.