कोरोना

आंबेगाव तालुक्यात नव्याने ६ कोरोना बाधित रुग्णांची भर

एकुण कोरोना बाधित रूग्ण झाले २९०
महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
घोडेगाव : आंबेगाव तालुक्यात रविवारी आलेल्या रिपोर्टनुसार नव्याने ६ रुग्णांची भर पडली आहे.  त्यामध्ये मंचर १, काठापूर १, पारगाव तर्फे अवसरी १, अवसरी खुर्द २, थुगाव १ अशा ६ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून आज २ रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या २९० झाली असून त्यातील २०३ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. एकूण ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून ८२ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. आवश्यकता असल्यास बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुवावेत. सॅनिटायझरचा वापर करावा. सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळावेत. तसेच सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी व ताप आल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात व ग्रामपंचायतीशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

2 days ago

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

5 days ago

MahaBulletin — 18 Jul 2026

शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…

1 week ago

MahaBulletin — 17 Jul 2026

बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

1 week ago

MahaBulletin — 14 Jul 2026

सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…

2 weeks ago

MahaBulletin — 13 Jul 2026

शनिवार, ११ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 मोशी…

2 weeks ago

This website uses cookies.