अध्यात्मिक

अलंकापुरीतून मंदिरे देवदर्शनास खुली करण्याच्या निर्णयाचे स्वागत

 

महाबुलेटीन न्यूज : अर्जुन मेदनकर
आळंदी देवाची : येत्या सोमवारी असलेल्या दिवाळी पाडव्या पासून ( दि.१६ नोव्हेंबर ) राज्यातील महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र असलेले भाविकांचे श्रद्धास्थान माऊली मंदिरासह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. या राज्य शासनाचे निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले असून मंदिरात दर्शनास ये-जा करताना दक्षता घेण्याचे आवाहन सर्व स्तरातून केले जात आहे. तीर्थक्षेत्र आळंदीतून आलेल्या मान्यवरांचे प्रतिक्रियेतुन दिसत आहे.  

शासन निर्णयाने लोकभावनेची कदर :- डॉ अभय टिळक  
———
मंदिरे भाविकांसाठी खुली करण्या बाबत प्रतिक्रिया देताना श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्त डॉ.अभय टिळक म्हणाले, कोरोंनाची तीव्रता कमी होत चालली होती, त्यामुळे या निर्णयाची अपेक्षा होतीच . मंदिरे देवदर्शनास खुली होत आहेत. शासनाचा हा निर्णय स्वागताहार्य आहे. या निर्णयाने आनंद होत आहे. दिवाळीतील पाडव्याचे शुभमुहूर्तावर मंदिरे देवदर्शनास भविकासाठी खुली होत आहेत. या निर्णयाने शासनाने लोकभावनेचीच कदर केली.

कार्तिक वारीसंदर्भात शासनाची अशीच रास्त भूमिका असावी :- चैतन्य महाराज कबीरबुवा
———–
 आळंदी येथील संत कबीर मठाचे प्रमुख ह भ प चैतन्य महाराज कबीरबुवा म्हणाले,  दीपावली पाडव्यापासून मंदिरात दर्शनासाठी भक्तांना प्रवेश देण्याचा शासनाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत. जनभावणेचा व वारकऱ्यांच्या मागणीचा शासनाने स्वीकार केला आहे. त्याबद्दल शासनाचे अभिनंदन व येणाऱ्या कार्तिक वारीसंदर्भात सुद्धा शासनाने अशीच रास्त भूमिका घेऊन वारकऱ्यांच्या प्रथा व परंपरा जोपासाव्यात ही पुढील अपेक्षा आहे. वारकरी संप्रदाय व भाविक भक्तांनी राखलेला संयम हा सुद्धा जगाच्या इतिहासात नोंदला जाणार आहे. संत विचार समाजाच्या रोमा रोमात भीनलेले असल्याने च दीर्घ काळ मंदिरे बंद ठेऊन भाविक भक्तांनी सामाजिक स्वास्थ्य म्हणजेच सामाजिक आरोग्य टिकवून पुढील काळासाठी सुद्धा उत्तम आदर्श निर्माण करून ठेवलेला आहे. शासना बरोबरच वारकऱ्यांचे व भाविक भक्तांचेही त्यांनी आभार व्यक्त केले.

शासनाचा निर्णय आनंददायी :- डॉ यशोधन महाराज साखरे
——-
शासनाने मंदीर खुली करण्याविषयी जो निर्णय घेतला आहे तो अत्यंत आनंददायी आहे . जनसामान्यांची भावनिक भूक परीपूर्ण होण्याचे दृष्टीने हे पाऊल उचलणे आवश्यक होते . मंदीर खुली आहेत तरी शासनाने सांगितलेली पथ्य पाळणे आवश्यक आहे हे भावीकांनी ध्यानात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गर्दीच्या व्यवस्थापनाची अत्यंत निकड आहे. त्या दृष्टीने मंदीर व्यवस्थापनाने योग्य नियोजन करणेही आवश्यक असल्याचे डॉ यशोधन महाराज साखरे यांनी सांगितले आहे.

 वारकरी संप्रदायाकडून संयमी आणि सुसंस्कृत पणाचे दर्शन :- चौधरी महाराज
———-
कोरोना या महामारीच्या ८,९ महिन्याच्या कालखंडात वारी व दर्शनाविना कामामध्ये काम।काही म्हणा रामराम॥ आपले कर्तव्य कर्म करत घरबसल्या साधनेत भाविक भक्तांनी काळ घालवत संयम दाखवला. यातुन संत विचारांचे दर्शन घडविले आणि सरकारला सहकार्य केले. हा संयम व सुसंस्कृत पणा पाहून महाराष्ट्र सरकारने ऐन दिवाळी पर्वणीच्या काळात सर्व मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला. व महाराष्ट्रातील जनतेला जणू दुग्धशर्कराचा योगच प्राप्त करुन दिला म्हणून महाराष्ट्र सरकारला धन्यवाद , जरी मंदिरे दर्शनासाठी खुली होत असली तरी भाविक भक्तांनी सरकारी नियमास अधीन राहून मंदिर व्यवस्थापनास सहकार्य करत  दर्शनाचा आनंद घेण्याची गरज कायम आहे. मंदिर व्यवस्थापनानेही नियमांचे काटेकोर पणे पालन करत कामात कोणताही ढिसाळ पणा करू नये. पुनश्च महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ साची नरहरी  महाराज चौधरी यांनी म्हंटले आहे.  

भाविकांत समाधानाची भक्ति लहर :- प्रल्हाद भालेकर  
————-
आळंदी येथील जनकल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रल्हाद भालेकर यांनी राज्य शासनाचा योगी निर्णय असल्याने या निर्णयाचे स्वागत केले असून शासनाचे नियम अटीचे पालन करून भाविक,वारकरी व राज्यातील ग्रामस्थांनी मंदिरात देवदर्शन करताना संबंधित मंदिर व्यवस्थापनाला भक्तिमय वातावरणात साथ देण्याची गरज असल्याचे सांगितले

सरकारने शब्द्ध दिल्याप्रमाणे पाळला या निर्णयाचे मनापासुन स्वागत :- लाहुडकर महाराज  
————-
गेल्या आठ महिण्यापासुन कोरोनाच्या या महामारीमुळे सामाजीक जबाबदारीचे भान ठेवुन सरकारला सर्व मंदिर बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. सर्वांना मंदिर उघडण्याची आस लागली होती, परंतु महाविकास आघाडी सरकारने शब्द दिला होता दिवाळीनंतर मंदिर उघडण्यात येतील. त्याप्रमाणे दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर मंदिर उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे मनापासुन स्वागत मंदिर जरी उघडणार असतील तरी कोरोना अजुन संपलेला नाही, गेल्या आठ महिन्यापासुन आपण आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतली त्याच पद्धतीने यापुढील काळातही  घेण्याचे आवाहन सागर महाराज लाहुडकर पाटील यांनी केले आहे.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 hour ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

This website uses cookies.