महाबुलेटीन न्यूज
आळंदी (अर्जुन मेदनकर ) : तीर्थक्षेत्र आळंदी मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. कोरोना महामारीचे सावटात यावर्षीची महाशिवरात्री आळंदी मंदिरासह परिसरातील शिवमंदिरांत मोजक्याच भाविकांचे उपस्थितीत साजरी करण्यात आली. गर्दी होवू नये याची दक्षता घेत आळंदी मंदिर व्यवस्थापनाने भाविकांचे दर्शनाची चोख व्यवस्था ठेवली. महाशिवरात्री निमित्त मंदिरात फुलांची लक्षवेधी पुष्पसजावट करण्यात आली होती. आळंदी पंचक्रोशीतील ठिकठिकाणच्या शिवमंदिरांत महाशिवरात्री निमित्त परंपरेने धार्मिक कार्यक्रम झाले.
आळंदी माऊली मंदिरासह श्री सिद्धेश्वर महाराज पुरातन शिव मंदिरात भाविकांनी दर्शन घेतले. माऊली मंदिरात परंपरेने पूजा, अभिषेक, प्रवचन, मारुती महाराज कुरेकर यांचे कीर्तन, गावकरी भजन व रात्री संतोष मोझे यांचे वतीने हरी जागर आदि कार्यक्रम हरिनाम गजरात झाले.
तिर्थक्षेत्र आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर, महाद्वार, श्रींचा गाभारा, पंखा मंडप आदि परिसर फुलांनी सजविल्याने आकर्षक दिसत होता. पुष्प सजावटीस विविध रंगी आकर्षक फुलांचा वापर करून माऊली मंदिर लक्षवेधी सजविण्यात आले. यात झेंडू, चाफा, गुलाब, मोगरा, केशर, तुळशी आदींचा वापर करण्यात आल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.
परिसरातील शिव मंदिरांत महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. आळंदी मंदिरात महाशिवरात्री निमित्त लक्षवेधी विविध रंगीबिरंगी फुलांचा वापर करून आकर्षक पुष्प सजावट मंदिरात करण्यात आली. या पुष्पसजावटीने श्रींचा गाभारा, मंदिर परिसर, मंदिर महाद्वार लक्षवेधी दिसत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या नियमांचे पालन करीत मंदिरात महाशिवरात्री साजरी करण्यात आल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.
येथील श्री वैतागेश्वर महाराज मंदिरात देखील भाविकांना दर्शनास गर्दी केली. गोपाळपुरातील श्री मारुती मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मोजक्याचा भाविकांत भजन सेवा व महाप्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी आळंदी जनकल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रल्हाद भालेकर, हभप. नवनाथ महाराज शिंदे आदी उपस्थित होते.
——
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
This website uses cookies.