महाबुलेटीन न्यूज
आळंदी (अर्जुन मेदनकर ) : येथील नगरपरिषदेच्या वतीने शहरातील व्यावसायिक आस्थापणात विना मास्क तपासणी मोहिमेत पथकाने १६ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करुन ८ हजार रुपये दंड वसुल केल्याची माहिती मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली.
या कारवाईसाठी खेड उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, आळंदीचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी मार्गदर्शन केले. या कारवाई प्रसंगी कार्यालयीन अधिक्षक किशोर तरकासे, विशाल बासरे, सागर भोसले, अर्जुन घोडे, मल्हारी बोरगे, गजानन गायकवाड, सोमनाथ वैरागे, पोलीस कर्मचारी मच्छिंद्र शेंडे आदींनी भाग घेतला.
यावेळी कोरोना महामारीचे संकट रोखण्यास प्रशासनाने केलेल्या सुचना, उपाय योजना, दिलेले आदेश यांचे पालन करण्याचे आवाहन मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी केले. विना मास्क फिरणारे व व्यावसायिक यांचेवर नियमित कारवाई केली जाणार असल्याचे कार्यालयीन अधिक्षक किशोर तरकासे यांनी सांगितले.
या कारवाईत आदर्श एजन्सी, सुपर टेलर्स, शिवशाकटी ज्वेलर्स, अलंकार ज्वेलरी, प्रकाश बॅग, योगेश मेडीकल, कुटुंब साडी अक्सेसरीज, कृष्णा फूड्स, प्रसाद ईलेक्ट्रिकल, शिवकृपा स्वीटस, कुंदन कलेक्शन, विजय व्हेजिटेबल्स, धनलक्ष्मी ज्वेलर्स, अनमोल फूट वेयर, साईबा टी हाऊस या व्यवसायीक आस्थापणावर विना मास्क आढळल्याने प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारणी करून १६ व्यावसायिकांकडून वसूली करण्यात आल्याचे किशोर तरकासे यांनी सांगितले.
—–
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…
This website uses cookies.