नारी शक्ती

श्री क्षेत्र आळंदीत महिला दिनी कष्टकरी महिलांचा सन्मान, रक्तदान व अन्नदान

श्री क्षेत्र आळंदीत महिला दिनी कष्टकरी महिलांचा सन्मान, रक्तदान व अन्नदान

महाबुलेटीन न्यूज : अर्जुन मेदनकर 
आळंदी : आळंदी शहर व पंचक्रोशीत विविध सामाजिक, आरोग्यदायी उपक्रमांसह महिलांचा सन्मान, सत्कार, अन्नदान, साडी वाटप तसेच रक्तदानाने ‘महिला दिन’ साजरा करण्यात आला. 

येथील मारुती देवस्थान ट्रस्टचे प्रांगणात आळंदी जनकल्याण फाउंडेशन संचलित ‘मधुकरी अन्नदान वाटप’ तसेच महिला दिनी सेवक इंदुबाई कदम, मंगलबाई पाटील, सीताबाई ढगे या अन्नदान छत्रातील सेवक कष्टकरी महिलांचा साडी चोळी देवून महिलांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे अध्यक्ष हनुमंत देवकर यांचे हस्ते साधक वारकरी यांना अन्नदान वाटप करण्यात आले. 

यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रल्हाद भालेकर, विश्वस्त अर्जुन मेदनकर, सचिन कु-हाडे, हभप. हनुमंत महाराज खाडे, सचिन वहिले, ज्ञानेश्वर घुंडरे, दिव्य ज्योती जागृती संस्थानचे साधक संजय होले, दिनकर तांबे, श्री मारुती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त हभप. नवनाथ महाराज शिंदे, हभप. सौरभ महाराज बेलकर आदि उपस्थित होते.

आळंदीत लॉकडाउन पासून अन्नदान वाटप सेवा सुरू असून लॉकडाउन नंतर आळंदी निवासी वारकरी साधक, अभ्यासक वारकरी विद्यार्थी यांचेसाठी एक वेळ जेवण मधुकरी वाटप सेवा सामाजिक बांधिलकी जोपासत अन्नदान सेवा अविरतपणे सुरू असल्याचे अध्यक्ष प्रल्हाद भालेकर यांनी सांगितले.

येथील भारतीय स्टेट बँक शाखेत शाखाधिकारी वैजयंता शर्मा यांचे हस्ते महिला दिनानिमित्त बँकेत महिला अधिकारी, पदाधिकारी, ग्राहक यांचा सन्मान करण्यात आला. येथील नियती फाउंडेशनच्या वतीने महिलाचा सन्मान व महिला दिना निमित्त रक्तदान शिबिराचे उत्साहात आयोजन करण्यात आले. यासाठी फाउंडेशनच्या अध्यक्षा नियती शिंदे यांनी परिश्रम घेत उत्साहात महिला दिनी विविध कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले.

आळंदी नगरपरिषद नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी महिलांचा सन्मान करीत महिला दिना निमित्ताने महिलाना शुभेच्छा दिल्या. महिलांच्या अडीअडचणी सोडविण्यास आपण नेहमी प्राधान्य देत असल्याचे त्यांनी सांगितले.
——

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

6 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

7 days ago

This website uses cookies.