महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
आळंदी / प्रतिनिधी : आळंदी शहरातील घरगुती गणपती, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडळांच्या गणेश मूर्ती येथील शाळेत संकलित करून ठेवण्यात आलेल्या होत्या. या सर्व मूर्तीचे विधिवत पूजन करून सव्हे क्रमांक 4 मध्ये विसर्जन करण्यात आले. ययासाठी आळंदी ग्रामठ व नागरिकांसह येथील सामाजिक कार्यकर्त्ये गोविंद कु-हाडे, नगरसेवक प्रकाश कु-हाडे यांनी विशेष प्रयत्न केले.
आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक 4 मधील विविध वर्ग खोल्यामध्ये असलेल्या सर्व गणेश मूर्तिचे यावेळी पूजन, आरती करीत या गणेश मूर्तींचे जय गणेश प्रतिष्ठान यांचे माध्यमातून मार्फत विसर्जन करण्यात आले.
आळंदी नगरपरिषद श्री फाउंडेशन च्या माध्यमातून मुर्ती दान स्वीकारून गेल्या चार वर्षांपासून आळंदीत उपक्रम राबवित होती. मात्र श्री फाउंडेशन यांनी सरसकट मूर्ति न नेल्याने उर्वरित मूर्ति या शाळेत नगरपरिषदेने ठेवल्या होत्या. अनेक दिवसांपासून विसर्जन करण्याची मागणी आळंदी शहर मनसे शहराध्यक्ष अजय तापकीऱ यांचेसह विविधा सेवाभावी संस्थांची होती. नवनियुक्त मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी या बाबत आळंदी ग्रामस्थ यांचे समवेत बैठक घेत यासाठी गोविंद कु-हाडे यांचे निवेदनाप्रमाणे कामकाज करण्यास ग्रामस्थ व उपस्थित पदाधिकारी यांनी संमती दिल्याने मूर्तींचे पूजन विधिवत विसर्जन शांततेत करण्यात आल्याचे नगरसेवक प्रकाश कु-हाडे यांनी संगितले.
यासाठी आळंदी नगारपरिषदे कडून कोणत्याही प्रकारचा खर्च घेण्यात आला नाही. आळंदी शहरातील जय गणेश प्रतिष्ठान व इतर सामाजिक कार्यकर्त्ये यांनी गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी नगरपरिषदेकडे परवानगी मागितली होती. यावेळी आळंदी नगरपरिषदेच्या परवानगी घेऊन गणेश मूर्तींचे विधिवत पूजा करून विसर्जन करण्यात आले.
यासाठी आळंदी नगरपरिषदेचे नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, गोविंदा कुऱ्हाडे, अरुण घुंडरे, कर निरीक्षक रामराव खरात, गणेश भक्त व नगरपरिषद कर्मचारी यांनी एकत्रित येऊन गणेश मूर्ती विसर्जनासाठी सहकार्य केले. या विधायक कामात आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी लक्ष दिल्याने त्यांचे आळंदीतून कौतुक होत आहे. जय गणेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंदा कुर्हाडे आणि त्यांचे सहकारी यांचे नागरिक व विविधा संस्थांचे वतीने अभिनंदन करण्यात आले.
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.