विधायक

आळंदीत १०१ रक्तदात्यांचे रक्तदान ; कोरोना योद्ध्यांचा सन्मान

 

महाबुलेटीन न्यूज
आळंदी / प्रतिनिधी : येथील आळंदी नगरपरिषदेचे नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे पाटील यांनी आपल्या वाढदिवसा निमित्ताने होणारा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकीतून तसेच कोरोंना संकट काळात पुणे शहरात असलेल्या रक्त पुरवठ्याची कमतरता लक्षात घेवून रक्तदान उपक्रमाचे आयोजन केले. या रक्तदान शिबिरात १०१ रक्तदात्यांनी रक्तदान करून उपक्रम यशस्वी केला. यावेळी रक्तदात्यांचा कोरोना योद्धा उत्कृष्ठ समाजकार्य सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन ह.भ.प. डॉ. नारायण महाराज जाधव, ह.भ.प.मुक्ताबाई महाराज बेलगावकर यांचे हस्ते झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई कु-हाडे, रोहन कु-हाडे, तेजस कु-हाडे, मनोहर कु-हाडे यांचेसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी रक्तदात्यांचा युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, नेहरू युवा केंद्र पुणे, आळंदी जनहित फाउंडेशनच्या वतीने कोरोना योद्धा व उत्कृष्ठ समाजकार्य सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. यासाठी नेहरू युवा केंद्र पुणेचे जिल्हा युवा अधिकारी यशवंत मानखेडकर यांनी उपक्रमास प्रेरणा देत उपक्रम राबविला. यासाठी राष्ट्रीय युवा स्वयंसेवक भाग्यश्री तापकीऱ, आळंदी जनहित फाऊंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी सामाजिक उपक्रम राबविला.

शिवस्मृती प्रतिष्ठान, नगरसेवक प्रकाश कु-हाडे स्पोर्ट्स फाउंडेशनने रक्तदान शिबरचे यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. १०१ रक्तदात्यांनी यात सहभागी होत रक्तदान केले. यात युवक, तरुण यांचेसह महिलांचा मोठा सहभाग घेतला. नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे यांनी अल्प काळात रक्तदान शिबिराचे आयोजन केले. आळंदीकर नागरिकांनी यास चांगला प्रतिसाद दिल्याने नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे यांनी सर्वांचे आभार मानले.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

5 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

5 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

7 days ago

This website uses cookies.