विधायक

आळंदी जनकल्याण फाऊंडेशनचे अन्नछत्रास हुतात्मा राजगुरु पत्रकार संघांचे अध्यक्ष श्री हनुमंत देवकर यांची सदिच्छा भेट

 

साधकांना अन्नछत्र कार्डचे वाटप
निवडी निमित्त फाऊंडेशनच्या वतीने देवकर मामांचा सत्कार

महाबुलेटीन न्यूज : अर्जुन मेदनकर
आळंदी देवाची : आळंदी जनकल्याण फाऊंडेशन संचलित श्री मुक्ताई माऊली अन्नछत्र अंतर्गत आळंदी निवासी वारकरी साधकांना दैनंदिन मधुकरी वाटप सेवा सुरु करण्यात आली आहे. या ‘अन्नदान – श्रेष्ठ दान’ उपक्रमास हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे खेड तालुका अध्यक्ष श्री हनुमंत देवकर, पत्रकार श्री प्रसन्नकुमार देवकर यांनी सदिच्छा भेट दिली.

यावेळी त्यांचेसह श्री.स्वा. ह.भ.प.जोग महाराज दिंडीचे प्रमुख ह.भ.प. गजानन महाराज लाहुडकर, आळंदी जनकल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रल्हाद भालेकर, फाउंडेशनचे सचिव व जिल्हा पत्रकार संघांचे प्रतिनिधी अर्जुन मेदनकर, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष हमीद शेख, सागर महाराज लाहुडकर, ज्ञानेश्वर घुंडरे पाटील आदी उपस्थित होते.

हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे खेड तालुका अध्यक्ष हनुमंत देवकर यांच्या हस्ते आळंदी येथील साधकांना अन्नछत्र कार्डचे वाटप करण्यात आले

यावेळी उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते अन्नदान वाटप व साधकांना अन्नछत्र कार्डचे वाटप पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष हनुमंत देवकर यांचे हस्ते करण्यात आहे. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री प्रल्हाद भालेकर यांचे हस्ते श्री देवकर मामांचा निवडी निमित्त सत्कार करण्यात आला. या प्रसंगी आळंदी जनकल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रल्हाद भालेकर, सचिव पत्रकार अर्जुन मेदनकर, विश्वस्त व्यवस्थापक गजानन महाराज लाहुडकर यांनी उपक्रमाची माहीती दिली.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 18 Mar 2026

मंगळवार, १७ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा…

1 day ago

MahaBulletin — 17 Mar 2026

पुणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका पुन्हा एकदा समोर आला आहे, चाकण येथे एका 32…

2 days ago

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

8 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

8 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

9 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

9 months ago

This website uses cookies.