सामाजिक

आळंदी ग्रामीण रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन साजरा

आळंदी ग्रामीण रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन साजरा

महाबुलेटीन न्यूज
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून पाळला जातो. १८५४ साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत हिंडणारी आद्य परिचारिका (नर्स) फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे. आळंदी ग्रामीण रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला.

जागतिक परिचारिका दिनानिमित्त आळंदीतील सामाजिक कार्यकर्ते अभयशेठ वडगावकर यांचे वतीने आळंदी ग्रामीण रुग्णालय या कोविड सेंटर मध्ये कार्यरत असलेल्या सर्व महिला नर्स यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जी.जी. जाधव यांचे हस्ते नर्स स्टाफला साडी वाटप करण्यात आले. यावेळी उद्योजक पोपटशेठ वडगावकर, प्रशांत वडगावकर, डॉ. एस कोलाड, विद्या कांबळे, आळंदी जनकल्याण फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, हमीद शेख, विकास वडगावकर,आयुष वडगावकर, आळंदी रुग्णालयातील सर्व स्टाफ उपस्थित होता.

जागतिक परिचारिका दिनानिमित्त सर्व नर्स यांनी एकत्र येऊन केक कापला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी.जी.जाधव यांनी सर्व नर्स स्टाफ ला शुभेच्छा देत आळंदी ग्रामीण रुग्णालयातील कोविड केंद्रातून ६४ रुग्ण बारे होवून घरी सुखरूप सोडण्यात आल्याचे सांगितले. आळंदीकरांना आरोग्य सेवा पुरेशा प्रमाणात प्रभावी पाने देण्यात येत असून सर्व ग्रामीण रुग्णालयातील स्टाफ चांगले काम करीत असल्याचे सांगितले. जागतिक परिचारिका दिनी आळंदीतील सामाजिक कार्यकर्ते अभय वडगावकर यांनी सामाजिक उपक्रम राबवित आरोग्य सेवारत कर्मचारी यांचा सन्मान करून कार्यास प्रेरणा दिल्याचे सांगितले. 

फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक शु्श्रूषा शास्त्राची संस्थापिका समजले जाते.फ्लॉरेन्स नाइटिंगेल (१२ मे १८२० – १३ ऑगस्ट १९१०) या अग्रगण्य परिचारिका, लेखक, संख्या शास्त्रज्ञ होत्या. १८५३ साली झालेल्या क्राइमियन युद्धा दरम्यान जखमी सैनिकांची सुश्रुषा केल्याबद्दल त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांना “लेडी विथ द लँप” (The Lady with the Lamp) असे म्हणत. आद्य परिचारिका (नर्स) फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिवस आळंदी ग्रामीण रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात आला. आळंदी जनकल्याण फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी प्रास्ताविक केले.
०००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 19 Mar 2026

बुधवार, १८ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे जिल्हा परिषद…

6 hours ago

MahaBulletin — 18 Mar 2026

मंगळवार, १७ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा…

1 day ago

MahaBulletin — 17 Mar 2026

पुणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका पुन्हा एकदा समोर आला आहे, चाकण येथे एका 32…

2 days ago

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

8 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

8 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

9 months ago

This website uses cookies.