कोरोना

आळंदी पंचक्रोशीत कोविड केअर सेंटरच्या विलंबाने नाराजी, रुग्णांच्या स्वब टेस्टिंगसाठी शिबीराची मागणी

आळंदी पंचक्रोशीत कोविड केअर सेंटरच्या विलंबाने नाराजी,
रुग्णांच्या स्वब टेस्टिंगसाठी शिबीराची मागणी

महाबुलेटीन न्यूज : अर्जुन मेदनकर
आळंदी : येथील पंचक्रोशीतील कोविड रुग्ण संख्या वाढत असल्याने तसेच स्थानिक ठिकाणी रुंगांचे उपचाराची सोय व्हावी यासाठी विलंब होत असलेले आळंदीतील कोविड केअर सेंटर तात्काळ सुरु करण्यासह आळंदी परिसरातील रुग्णाच्या स्वाब तपासणीची व्यवस्था आळंदीत करण्याची मागणी माजी नगरसेवक दिनेश घुले यांनी खेड प्रशासनास केली आहे.

या मागणीचे निवेदन खेडचे प्रांत संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. गाढवे, आळंदीचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांचेसह खेडचे आमदार दिलीप मोहिते यांना मागणी करून या गंभीर विषयाकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले असल्याचे माजी नगरसेवक दिनेश घुले यांनी सांगितले.

आळंदी येथील ग्रामीण रुग्णालयात स्वाब तपासणी करून स्थानिक ठिकाणी रूग्णांना आरोग्य सेवा मिळावी, यासाठी आमदार दिलीप मोहिते यांनाही लक्ष देण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आळंदीतील एमआयटी महाविद्यालयात सुमारे १८० रुग्णांची व्यवस्था होईल असे कोविड केअर सेंटर गेल्या महिन्यापासून सुरु होण्याचे प्रतीक्षेत आहे. यासाठी मेडिकल, इतर सुविधा व यंत्रणा येथे येऊन पडली आहे. मात्र पुरेशा प्रमाणात कर्मचारी वर्ग, वैद्यकीय तज्ञ उपलब्ध न झाल्याने आळंदी व पंचक्रोशीतील रुग्णांना पिंपरी चिंचवड, पुणे, चाकण, म्हाळुंगे या भागात उपचारास जावे लागत आहे.

याशिवाय येथील ३ खाजगी रुग्णालयात उपचार केले जात असून अद्याप शासनाने या तीन रुग्णालयांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेची मंजुरी दिली नसल्याने येथील उपचार घेत असलेल्या रुग्णांना बिलासाठी धावपळ करावी लागत आहे. शासनाचे नियमाप्रमाणे येथे उपचार घेऊन गेलेल्या सर्व रुग्णांना शासनाने बिल अदा करून संबंधित सर्व रुग्णांचे घेतलेले बिल परत देण्याची मागणी होत आहे. कोविड रुग्णांना दिड लाख रुपयांपर्यंतचे बिल या योजनेतून देण्याची गरज असताना लाभ मिळाला नाही. यामुळे शासनाने तात्काळ आळंदीत सेंटर सुरु करून स्थानिक ठिकाणी परिसरातील रुग्णांची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आळंदीत कोरोंना रुग्ण सेवेसाठी येथील एम. आय. टी. कॉलेज मध्ये कोविड केअर सेंटर मंजूर झाले असून, ते रुग्ण सेवेस सुरू करण्यात आले नाही. यामुळे येथील रुग्णांची गैरसोय होत असल्याने प्राधान्याने आळंदीत कोविड केअर सेंटर तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच आळंदीत शासकीय यंत्रणे मार्फत रुग्णांचे लाळेची तपासणी (स्वब) टेस्टिंगची सेवा स्थानिक ठिकाणी उपलब्ध करून देवून दिलासा देण्यात यावा. तसेच आळंदीतील रुग्णांची स्वब तपासणीसाठी शिबीर अथवा फिरत्या स्वब तपासणी वाहनातून व्यवस्था केल्यास पुढील दक्षता घेवून भविष्यातील रुग्ण वाढीचे प्रमाण कमी होवून रोखता येईल, असे घुले यांनी सांगितले आहे.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

6 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

7 days ago

This website uses cookies.