अखेर आश्रमशाळेवर पोहोचला रेशनिंगचा माल

महाबुलेटीन नेटवर्क / शैलेश काटे
इंदापूर : शरद पवारांच्या आदेशानंतर, गेल्या वर्षी फडणवीस सरकारने बंद केलेला आश्रमशाळांचा रेशनिंगवरचा गहू तांदूळ आता मिळू लागला आहे.
या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणारे मातोश्री रमाबाई
आंबेेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांनी
भटक्या विमुक्तांच्या आश्रमशाळा, मुकबधिरांच्या आश्रमशाळा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची वसतिगृहे यांना रेशनिंगवर मिळणारा गहू व तांदूळ बंद केला होता. त्या वेळेपासून आजपर्यंत त्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या तीन लाख विद्यार्थ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. या संदर्भात आपण वेळोवेळी आवाज उठवला होता. दरम्यान सत्ताबदल झाला. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले, असे सांगून मखरे म्हणाले की, शरद पवार यांच्या लक्षात आपण ही बाब आणून दिली. पवार साहेबांनी याबाबत त्वरित लक्ष देण्याचे आश्वासन दिले. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना तशा सूचना दिल्या. भुजबळांनी तातडीने लक्ष घालून रेशनिंगवरचा बंद झालेला गहू, तांदूळ मिळण्याविषयी हालचाल केली.
सोमवारी ( दि.७ जुलै ) मातोश्री रमाबाई आंबेेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित भिमाई आश्रमशाळेवर रेशनिंगचा गहू तांदुळ पोहोचला. संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर मखरे, सचिव समीर मखरे, प्राचार्य अनिता साळवे-मखरे, मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राथमिक आश्रमशाळेचे उपमुख्याध्यापक राजेंद्र सोनवणे व इतर कर्मचाऱ्यांनी फटाके वाजवून माल घेऊन येणाऱ्या टेंपोचे स्वागत करून पुजन केले. संस्थेच्या संचालिका अनार्या मखरे यांनी शरद पवार व महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले.
admin

Recent Posts

MahaBulletin — 26 Jul 2026

शनिवार, २५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेडमध्ये…

15 hours ago

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

4 days ago

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

7 days ago

MahaBulletin — 18 Jul 2026

शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…

1 week ago

MahaBulletin — 17 Jul 2026

बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

1 week ago

MahaBulletin — 14 Jul 2026

सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…

2 weeks ago

This website uses cookies.