प्रशासकीय

आद्य क्रांतिकारक नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्याकडून अभिवादन,

पुणे जिल्ह्यात जयंती साधेपणाने साजरी

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे ( दि. ७ सप्टेंबर ) : आज आद्य क्रांतीकारक नरवीर राजे उमाजी नाईक यांची २२९ वी जयंती संपुर्ण महाराष्ट्रामधे साजरी करण्यात आली. कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, यंदा अगदी साध्या पद्धतीने कार्यक्रम राज्यभरात पार पडत आहे.

राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास सर्वसाधारण शाखेचे प्र.तहसिलदार श्रावण ताते व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

खेड तालुक्यात ( राजगुरूनगर ) येथील तहसिलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, पंचायत समिती, गढई मैदान, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडाचीवाडी, चाकण पोलीस स्टेशन आदी ठिकाणी उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी तहसिलदार सुचित्रा आमले, नायब तहसिलदार राजेश कानसकर, पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. मंडले, गट विकास अधिकारी अजय जोशी, चाकण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. प्रकाश धस, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख श्री. शिवाजी वर्पे, तालुका प्रमुख श्री. रामदास धनवटे, पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री. भगवान पोखरकर, तसेच एल. बी. तनपुरे, नगरसेवक श्री. महेश शेवकरी, मनोहर गोरगले, कैलास जाधव, आप्पा भंडलकर, राहुल भंडलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 05 Nov 2026

बुधवार, ४ नोव्हेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ विकास…

1 day ago

MahaBulletin — 03 Nov 2026

सोमवार, २ नोव्हेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कुरकुंडी…

3 days ago

MahaBulletin — 02 Nov 2026

रविवार, १ नोव्हेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अदिती…

4 days ago

MahaBulletin — 01 Nov 2026

शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 वाहतूक…

5 days ago

MahaBulletin — 31 Oct 2026

शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 पाणी…

6 days ago

MahaBulletin — 30 Oct 2026

गुरुवार, २९ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 पाणी…

1 week ago

This website uses cookies.