महाबुलेटीन न्यूज : हनुमंत देवकर
अभिनेता जॅकी श्रॉफ हे अत्यंत हलाकीच्या आणि कठीण परिस्थितीतून वर आलेले अभिनेते आहेत. याची माहिती त्यांनी अनेकवेळा आपल्या मुलाखतीत दिलेली आहे. मात्र यशाची इतके शिखर गाठून सुद्धा त्यांनी कधी या यशाचा गर्व केला नाही.
याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. आपल्या घरी घरकाम करणाऱ्या मुलीच्या आजीचे निधन झाल्यानंतर तिचे आणि तिच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी जॅकी श्रॉफ थेट मावळ येथे त्यांच्या घरी दाखल झाले होते. यावेळी त्यांनी तिच्या परिवाराचे सांत्वन करून धीर देण्याचे काम केले. जॅकी यांनी अगदी सर्वसामान्यांप्रमाणे जमीनीवर बसून घरातील वरिष्ठांचीही चौकशी करत त्यांना धीर दिला.
जॅकी श्रॉफ यांचा मावळ येथील चांदखेड येथे बंगला असून मुंबईमधून ते अनेकवेळा आराम करण्यासाठी मावळच्या बंगल्यावर दाखल होत असतात. अशाच एका भेटीदरम्यान श्रॉफ यांच्याकडे काम करणाऱ्या दीपालीच्या आजीचे शंभराव्या वर्षी नुकतच निधन झाल्याची माहिती त्यांना मिळाली व त्यांनी घरी जाऊन तिची भेट घेतली.
———–
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.