महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर ( दि. २९ ऑगस्ट ) : खेड तालुक्यात कोरोना रुग्णांनी थैमान घातले असून आज कोरोना बाधित संख्येचा विस्फोट झाला आहे. मागील आठवड्यात तालुक्यात एकूण ६३८ रुग्ण आढळले असून ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या २० टक्क्यांच्या वर गेली आहे. आज तालुक्यात १३८ रुग्ण आढळले असून त्यापैकी एकट्या राजगुरूनगर मध्ये ३८ रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी येलवाडी व चाकण येथील दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून तालुक्यात आजपर्यंत २३७३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज नगरपरिषद क्षेत्रात ७५ तर ग्रामीण भागात ६३ रुग्णांची भर पडली आहे. राजगुरूनगर व चाकणला सर्वाधिक रुग्ण आढळले असून तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ३०७५ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
———————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ४३ ) :
राजगुरूनगर – ३८,
चाकण – २६,
आळंदी – ११,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ६३ ) :
मेदनकरवाडी ८,
नाणेकरवाडी ५,
चिंबळी – ४,
खराबवाडी – ४,
निघोजे – ४,
भोसे – ४,
केळगाव – ४,
शेलपिंपळगाव ४,
खरपुडी बुद्रुक – ४,
कडुस – ३,
येलवाडी – ३,
मरकळ – ३,
आंबेठाण – २,
रासे – २,
वडगाव घेनंद – २,
चांडोली – १,
महाळुंगे इंगळे – १,
मांजरेवाडी – १,
शिरोली – १,
सोळू – १,
निमगाव – १,
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – १३८
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ३०७५
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ७४
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ६२८
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – २३७३
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : राजगुरूनगर – ३८, चाकण – २६, आळंदी – ११,
# मयत झालेल्या एकूण व्यक्ती : २ ( वय ६०, रा. येलवाडी व वय ८०, रा. चाकण )
बुधवार, २९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…
मंगळवार, २८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…
सोमवार, २७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भामास्केट…
रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…
शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
This website uses cookies.