महाबुलेटिन नेटवर्क / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड : चिखली येथील म्हेत्रेवस्ती मधील एका ९० वर्षीय आजीने कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी ( दि. १४ ) या आजी चिखली येथील घरी आल्या असता नागरिकांनी रांगोळी काढून व पुषपवृष्टीचा वर्षाव करीत आजीचे टाळ्या वाजवून स्वागत केले आहे. मुक्ताबाई हिरामण पांचाळ असे या आजीचे नाव आहे.
त्यांचा मुलगा माधव पांचाळ यांचा हार्डवेअर चा व्यवसाय असून नागरिकांच्या संपर्कातून त्यांना व त्यांच्या संपर्कातून त्यांच्या आईला कोरोना संसर्ग झाला होता. थंडी, ताप, खोकला आदी लक्षणे आल्याने त्यांना ३० जून रोजी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १५ दिवस उपचार सुरु असताना त्यांनी या वयातही इच्छा शक्तीच्या जोरावर कोरोनावर मात करून त्यांना काल घरी सोडण्यात आले. त्यांच्या सोसायटीतील नागरिकांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले.
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…
मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…
This website uses cookies.