21 वर्षीय तरुणाचा गोळ्या घालून व कोयत्याने वार करून निर्घृण खून,आरोपी फरार

तीन जणांवर गुन्हा दाखल
महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
पुणे : शहरातील दत्तवाडीत मध्यरात्री एका 21 वर्षीय तरुणाचा गोळ्या झाडून व कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमित मिलिंद सरोदे ( वय 21, रा. जनता वसाहत, गल्ली नं. 15 ) असे खून झालेल्याचे तरुणाचे नाव आहे. हा खून पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
याप्रकरणी आदर्श ननावरे, बोंबल्या व यशवंत कांबळे यांच्यावर दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोर खून करून पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अमित हा येथील शाहू वसाहतीसमोरील बालाजी होलसेल दुकानाच्या जवळ थांबला असता अचानक आलेल्या तीन जणांच्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला केला. त्यावेळी ननावरे याने पिस्तूलमधून गोळी झाडली. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने सपासप वारकरून निर्घृण खून केला.
या घटनेची माहिती मिळताच दत्तवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी अमित हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. अचानक झालेल्या या गोळीबाराने परिसरात मोठा गोंधळ उडाला होता. या खुनाच्या थराराने दत्तवाडी परिसरात खळबळ उडाली आहे असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
admin

Recent Posts

MahaBulletin — 26 Jul 2026

शनिवार, २५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेडमध्ये…

11 minutes ago

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

3 days ago

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

6 days ago

MahaBulletin — 18 Jul 2026

शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…

1 week ago

MahaBulletin — 17 Jul 2026

बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

1 week ago

MahaBulletin — 14 Jul 2026

सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…

2 weeks ago

This website uses cookies.