शैक्षणिक

११ वीसाठी निवडा, आवडीचं महाविद्यालय;

बुधवारपासून सुरू होणार दुसरा टप्पा
महाबुलेटिन नेटवर्क
पुणे : इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश घेताना आपल्या आवडीचे महाविद्यालय मिळावे असे विद्यार्थ्यांची, पालकांची अपेक्षा असतेच. त्यासाठी त्यांची उत्सुकताही ताणली गेलेली आहे. अखेर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये11वी प्रवेश निश्‍चित करण्यासाठी भाग दोन अर्ज भरणे म्हणजेच पसंती क्रमांक नोंदविण्यासाठी इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश नियंत्रण समितीने जाहीर केले आहे.
          12 ऑगस्ट (बुधवार) ते 22 ऑगस्ट या कालावधीत भाग दोन अर्ज भरता येईल. तर पहिल्या प्रवेश फेरीची प्रक्रिया 23 ऑगस्टपासून जाहीर होणार आहे. 11वी प्रवेशासाठी भाग एक अर्ज भरण्यास 1 ऑगस्टपासून सुरूवात झाली असून. यंदा 304 महाविद्यालयांमध्ये 1 लाख 6 हजार 972 प्रवेश क्षमता आहे. त्यासाठी आत्तापर्यंत 91 हजार 763 जणांनी नोंदणी केली असून, 64 हजार 423 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत, त्यांना आता भाग दोनचा अर्ज भरावा लागणार आहे. याची मुदत 12 ऑगस्ट रोजी पहाटे 5 पासून 22 ऑगस्ट रात्री 11 पर्यंत आहे.
      ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप भाग एक अर्ज भरलेला नाही, त्यांनाही या कालाधीत भाग एक आणि दोन अर्ज भरता येईल. तसेच विद्यार्थ्यांचे अर्ज तपासणी व मार्गदर्शन केंद्र सुरू राहणार आहे.
हे लक्षात ठेवा :
– विद्यार्थ्याने अर्जात निवडलेल्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालयाचे नाव पहिल्याच फेरीत असेल तर प्रवेश घेणे बंधनकार असेल.
– संधी मिळूनही प्रवेश घेतला नाही तर पुढील फेरीमध्ये त्यांना संधी मिळणार नाही.
– प्रवेश रद्द केला असेल किंवा घेतला नसेल तर विशेष फेरीपर्यंत थांबावे लागेल.
– प्रवेश रद्द करायचा असेल तर संबंधित उच्च महाविद्यालयाला विनंती करून प्रवेश रद्द करावा.
महत्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे :
भाग दोन अर्ज भरण्याची मुदत – 12 ते 22 ऑगस्ट
हरकती, सूचना नोंदविण्याची मुदत – 23 ते 25 ऑगस्ट
पहिली फेरी जाहीर – 30 ऑगस्ट
फेरीत निवड झालेल्यांनी प्रवेश निश्‍चीत करणे – 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 21 Jun 2026

शनिवार, २० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 🛣️ पुणे-नाशिक…

11 hours ago

MahaBulletin — 20 Jun 2026

शुक्रवार, १९ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुणे-नाशिक…

1 day ago

MahaBulletin — 19 Jun 2026

गुरुवार, १८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…

2 days ago

MahaBulletin — 18 Jun 2026

बुधवार, १७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ मोठे…

3 days ago

MahaBulletin — 15 Jun 2026

रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…

6 days ago

MahaBulletin — 14 Jun 2026

शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…

1 week ago

This website uses cookies.