आरोग्य

आनंदाची बातमी – अखेर पुण्यातील 11 महिन्यांच्या बाळाला दिली 16 कोटींची अमेरिकेची लस ! वेदिकाच्या पालकांनी मानले जनतेचे आभार

अखेर वेदिकाला दिली गेली 16 कोटींची लस ! वेदिकाच्या पालकांनी मानले जनतेचे आभार

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे येथे SMA TYPE 1 हा दुर्मिळ आजार झालेल्या 11 महिन्यांच्या वेदिका सौरभ शिंदे या बाळाला zolgensma ही लस अमेरिकेतून आयात करून देण्यात आली.

गेली तीन महिने जीवाचे रान करून पिंपरी-चिंचवड मधील भोसरी येथील सौरभ शिंदे यांना आपल्या मुलीच्या दुर्मिळ आजाराच्या उपचारासाठी लागणारे 16 कोटी रुपये तीन महिन्यात क्राऊडफंडिंगच्या माध्यमातून जमा करण्यात यश आले आहे.

वेदिकाला हॉस्पिटल मध्ये नेऊन सर्व गरजेच्या चाचण्या डॉक्टरांनी करून घेतल्या. वेदिकाच्या सर्व चाचण्या व्यवस्थित असल्याची खात्री करून त्यानंतर लस देण्यात आली. तिची प्रकृती चांगली आहे. हे वन टाईम जिनथेरेपी असल्याने सिंगल डोस इंजेक्शन दिले. 

22 कोटीचे हे इन्जेक्शन सर्व कर माफ होऊन ते 16 कोटीला मिळाले. यासाठी अनेक लोकांनी या वेदिकासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणुन जमेल तशी मदत केली. त्यामुळे 11 महिन्यांच्या वेदिकाला लागणारे जीन रिप्लेसमेंटचे ‘झोलजेन्स्मा’ हे इंजेक्शन वेळेत मिळाले. 

या लसीवरील आयात शुल्क माफ करण्या करिता वेदिकाचे वडील सौरभ शिंदे यांनी राज्याच्या आरोग्य भवन विभागाशी व केंद्रीय वित्त मंत्रालया बरोबर पत्रव्यववहार केला होता. याची दखल घेवुन केंद्र सरकारने आयातशुल्क व कर माफ केले आहे.

यासाठी सिने-अभिनेते निलेश दिवेकर अणि मंत्री-महोदय श्री. नितिन गडकरी यांचे सचिव संकेत भोंडवे यांचे योगदान मोलाचे होते, अशी माहिती वेदिकाचे वडील सौरभ शिंदे यांनी दिली.

वेदिका अवघी 8 महिन्यांची असताना तिला SMA TYPE 1 हा दुर्मिळ आजार झाला असल्याचे निदर्शनास आले. या आजारावर zolgensma ही लस देणे गरजेचे होते, त्याप्रमाणे एका सामान्य कुटुंबातील वेदिकाचे वडील सौरभ आणि स्नेहा शिंदे यांनी जीवाचे रान करून तब्बल 16 कोटी रुपये लोकनिधी व सीएसआर मार्फत जमा केले आणि आज त्या सर्व मेहनतीचे चीज झाले, ज्या दात्यांनी आपल्या आपल्या परीने जेवढी शक्य होईल तेवढी मदत केली, त्या सर्व जनतेने आशीर्वाद दिले. या सगळ्यांच्या कष्टाचे आज फळ मिळाले आणि वेदिकला लस भेटली, अशा भावना वेदिकाच्या पालकांनी व्यक्त केल्या.

एक खूप अशक्य वाटणारी लढाई शक्य झाली, याचे सर्व श्रेय दात्यांना तसेच ज्यांनी ज्यांनी ज्या प्रकारे मदत करता येईल त्या प्रकारे मदत केली अशा सर्व व्यक्तींचे, उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर व त्यांचे सहकारी या सर्वांचे शिंदे कुटुंब शतशः ऋणी राहील, माणुसकी अजूनही जिवंत आहे, हेच या 16 कोटींच्या लढाईतून सिद्ध झाले आहे. मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार अनेक राजकीय मंडळी, पत्रकार तसेच देशातील जनतेबरोबर विदेशातून देखील वेदिकासाठी मदतीचा ओघ सुरू होता.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विशेष प्रयत्न करून शक्य तितकी मदत केली. तसेच खा. डॉ. कोल्हे यांनी संसदेत इन्जेक्शन वरील आयात शुल्क कर माफ व्हावा, आणि अशा आजारांसाठी विशेष तरतूद करावी, अशी मागणी देखील केली. भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे पाटील यांनी सुरवातीपासून लस मिळे पर्यंत शिंदे कुटुंबा सोबत उभे राहून लागेल ती मदत केली, असे देखील शिंदे कुटुंबीयांनी आवर्जून सांगितले. 
०००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.